शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Video: अक्षदांऐवजी पावसाच्या सरी कोसळल्या; वादळात मंडप उडाल्याने वऱ्हाडींची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 19:44 IST

लग्नाच्या मुहूर्तावर झालेल्या अवकाळीमुळे वऱ्हाडींना इतरत्र आसरा शोधावा लागला.

- सचिन लहानेछत्रपती संभाजीनगर : लग्नाची घटिका काही मिनिटांवर आलेली असतानाच अचानक सोसाट्याचा वारा, वादळासह जोरात पाऊस आला. या पावसाने मंडपाचे होत्याचे नव्हते करून टाकले. मंडप उडून गेला. वऱ्हाडींची धावपळ उडाली. ही घटना घडली शहराजवळील गांधेली गावात.

गांधेलीतील तळेकर कुटुंबातील मुलीचा लाडसावंगी येथील गाडेकर यांच्या मुलासोबत आज विवाह होता. लग्नासाठी दोन्हीकडील नातेवाईक मंडळी जमली होती. लग्न लागण्याच्या ऐन मुहूर्तावरच विनानिमंत्रित अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाहता पाहता मांडवावर पाऊस बरसू लागला. त्यात वाऱ्याने मांडवाचे नुकसान केले. मंडपात सगळीकडे पाणीच पाणी साचले. लग्नाच्या मुहूर्तावर झालेल्या अवकाळीमुळे वऱ्हाडींना इतरत्र आसरा शोधावा लागला. वऱ्हाडीची धावपळ पाहून गावातील अनेकांनी घराची दारे उघडून पाहुण्यांना आश्रय दिला. लग्नास बनविलेले पंचपक्वानही अवकाळी पावसात वाहून गेले, अवकाळीचे संकट निघून गेल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता नियोजित विवाह थाटात पार पडला. यात गावकऱ्यांनी दाखविलेले एकीचे दर्शन सर्वांच्या मनाला भावले.

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादmarriageलग्न