१७ फूट उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
By Admin | Updated: August 31, 2014 01:09 IST2014-08-31T01:01:38+5:302014-08-31T01:09:17+5:30
उमरगा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात येथील गणराज गणेशोत्सव मंडळाच्या १७ फुट उंचीच्या गणरायाची स्थापना उत्साहात करण्यात आली असून,

१७ फूट उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
उमरगा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात येथील गणराज गणेशोत्सव मंडळाच्या १७ फुट उंचीच्या गणरायाची स्थापना उत्साहात करण्यात आली असून, शहराच्या गणेश उत्सवाच्या इतिहासात या मंडळाने १७ व्या वर्षात पदार्पण केल्याने १७ फुट उंचीच्या हनुमान उड्डाण गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील गणेश भक्तांची झुंबड उडाली आहे.
येथील आरोग्य नगरमधील गणराज गणेशोत्सव मंडळाच्या स्थापनेला १६ वर्ष पूर्ण होवून या मंडळाने १७ व्या वर्षात पदार्पण केले. १७ व्या वर्षाच्या पदार्पणामुळे या मंडळाच्या वतीने खास सोलापूर येथून गजराजाच्या सोंडेवर पाय ठेवून हनुमान उड्डाण करीत असल्याची प्रेक्षणीय गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. सोलापूर येथील मूर्तीकार दिपक वाईटला या मूर्तीकारांनी या मूर्तीला आकार दिला आहे.
शुक्रवारी सायंकाळी १७ फुट उंचीच्या मूर्तीचे शहरात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात येवून श्रीं च्या आगमनाप्रित्यर्थ १७ तोफांची सलामी देण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात श्रीं च्या भव्य मूर्तीची मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. क्रेनच्या सहाय्याने मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सोलापूर येथील श्रीराम फायनान्सचे व्यवस्थापक संतोष पाटील व वर्षाराणी पाटील यांच्या हस्ते श्रीं ची स्थापना करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष बालाजी पाटील, उपाध्यक्ष गोपाळ जाधव, सचिव शरद पवार, कोषाध्यक्ष नागराज तेलंग, प्रताप मुगळे, बाळू माळी, लक्ष्मण खरटमोल, संगमेश्वर भडोळे, जगदीश सुरवसे, मनोज पाटील, मनोज जाधव, संदीप पांचाळ, रंगेश मुरमे आदींसह मंडळाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शहराच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच १७ फुट उंचीची हनुमान उड्डाण गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (वार्ताहर)