गुरुंमुळेच प्रेरणा
By Admin | Updated: July 12, 2014 00:54 IST2014-07-12T00:54:37+5:302014-07-12T00:54:37+5:30
मला या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकायला मिळाले हेच माझे भाग्य आहे.
गुरुंमुळेच प्रेरणा
मला या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकायला मिळाले हेच माझे भाग्य आहे. त्यामुळेच आज मी माझे अल्बमस् काढू शकले. माझे गुरू नेहमी म्हणायचे की, तू नक्कीच नाव मोठे करशील. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या गुरूंच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम.
आरती पाटणकर ल्ल
क्षेत्र कोणतेही असो, त्यात टिकण्यासाठी प्रयत्न तर करीतच असतात. गरज असते ती फक्त दिशा देण्याची. हे दिशा देण्याचे काम फक्त गुरूच करू शकतात. त्यामुळे गुरूला फार मोठे स्थान आहे. माझ्या जीवनात गुरुपौर्णिमा हा एक मोठा सण आहे. क लेच्या क्षेत्रात निपुण होण्यासाठी गुरूशिवाय दुसरा पर्याय नाही. गुरुपौर्णिमा ही आम्हा कलाकारांसाठीफार मोठी गोष्ट आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाने कला कोणतीही असो ती अवगत करण्यास सोपी जाते.
मी पंधरा वर्षांची असताना गायनाला सुरुवात केली. गेल्या पंधरा वर्षांपासून माझी ओळख शास्त्रीय संगीत गायिका म्हणून आहे. तसेच सुरुवातीला मी स्व. पंडित बाळासाहेब बहिरगावकर यांच्याकडे जयपूर घराण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर स्व. मधुसूदन भावे यांच्याकडे ग्वालियर या संगीत प्रकाराचे शिक्षण मी घेतले. वेगवेगळ्या प्रकारचे गायन करण्याची मला आवड आहे. तसेच माणूस हा मरेपर्यंत शिकत असतो. काही ना काही नवीन शिकायला तो झटतच असतो. त्याप्रमाणे मी माझे गायनाच्या क्षेत्रातील शिक्षण हे पुढे चालूच ठेवले. हे शिक्षण घेत असताना मला अनेक अडचणी आल्या. त्या अडचणी सोडवण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मी सोडवणूक करू शकले.
कितीही मोठे कलाकार झालो तरी गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज ही त्याला भासतच असते. पुढे चालून उस्ताद अफजल हुसेन यांच्याकडे द्रुपद गायकीचे शिक्षण मी घेतले आणि सध्या बनारस घराण्याचे ठुमरी तालीम या गायनाचे शिक्षण मी बद्रीप्रसाद मिश्रा यांच्याकडे घेत आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाचा शिष्यांना फार मोठा आधार मिळतो. त्यांच्या मार्गदर्शनाने कलेला जिवंतपणा येतो असे मला वाटते.