शिक्षण विभागाचे तपासणी पथक मनाठ्यात

By Admin | Updated: July 14, 2014 01:02 IST2014-07-14T00:20:40+5:302014-07-14T01:02:37+5:30

हदगाव : विद्यार्थी व समाजातील नागरिक यांचा सुसंवाद व्हावा यासाठी शाळा सुरू झाल्यापासून लक्षवेधी नमस्कार उपक्रम सुरू केला़

Inspection team of Education Department | शिक्षण विभागाचे तपासणी पथक मनाठ्यात

शिक्षण विभागाचे तपासणी पथक मनाठ्यात

हदगाव : शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोठ्या माणसाविषयी अकारण वाटणारी भीती कमी व्हावी, विद्यार्थी व समाजातील नागरिक यांचा सुसंवाद व्हावा यासाठी शाळा सुरू झाल्यापासून लक्षवेधी नमस्कार उपक्रम सुरू केला़ त्या उपक्रमाला गावागावात कसा प्रतिसाद मिळतो, यासाठी तपासणी पथक नियुक्त केले़ मनाठ्यात या पथकाने तपासणी केली़
मराठी शाळांची, इंग्रजी शाळांशी स्पर्धा करताना होणारी दमछाक कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळी उपक्रम राबविण्यात येत आहे़ लक्षवेधी नमस्कार असाच एक उपक्रम़ शाळेत येताना-जाताना भेटणाऱ्या वडीलधारी ओळखीचे अथवा अनोळखी नागरिकांना विद्यार्थ्यांनी नमस्कार करायचा आहे़ या उपक्रमाला मनाठा गावात चांगला प्रतिसाद मिळत असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण विस्तार अधिकारी एस़ एऩ बाच्छे यांनी दिली़
हा उपक्रम सुरू करून सीईओ अभिमन्यू काळे थांबले नाहीत तर त्यांनी त्या उपक्रमाची तपासणीही सुरू केली़ वेगवेगळी पथके तयार करून प्रत्येक शाळा तपासली जात आहे़ मनाठा येथील जि़प़ शाळेत हे पथक सकाळी १० वाजता दाखल झाले़ सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही हात जोडून पथकाला नमस्कार केला़ मुख्याध्यापक पंजाबराव देशमुख, आशा राजगुरू, पद्मे , विस्तार अधिकारी कापसे मॅडम, केंद्रप्रमुख सोळंके सर उपस्थित होते़
यानंतर हे पथक आदर्श विद्यालयात गेले़ नंतर शिप्रसाद मालीवाल प्राथमिक शाळा तपासली़ मुख्याध्यापक सुहास शिंदे, उपमुख्याध्यापक के़एऩ सोडवे, सावतकर, चंद्रमनी, श्यामराव सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, सोनकांबळे उपस्थित होते़ (वार्ताहर)
मुले सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून शाळेला जाताना नमस्कार करतात - कचरू महाराज सूर्यवंशी, पालक
आम्ही रस्त्यावरून जाताना अनोळखी विद्यार्थी येऊन नमस्कार करतो़ चांगलं वाटतं, त्या विद्यार्थ्याचं कौतुक करतो - माधवराव सूर्यवंशी, पालक
नमस्कार करताना सुरुवातीला भीती वाटते़ प्रतिसाद मिळाला की आनंद होतो - प्रियंका सोनाळे, विद्यार्थिनी जि़प़ शाळा़

Web Title: Inspection team of Education Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.