धर्मदाय सहआयुक्तांकडून शनि मंदिराची पाहणी
By Admin | Updated: April 13, 2015 00:49 IST2015-04-13T00:31:19+5:302015-04-13T00:49:47+5:30
बीड : येथील शनिमंदिर जागा ताब्यात घेऊन त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच स्थावर मालमत्ता व जंगम मालमत्ता यामधील भ्रष्टाचार व गैरव्यवहारा

धर्मदाय सहआयुक्तांकडून शनि मंदिराची पाहणी
बीड : येथील शनिमंदिर जागा ताब्यात घेऊन त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच स्थावर मालमत्ता व जंगम मालमत्ता यामधील भ्रष्टाचार व गैरव्यवहारा विरुद् रामनाथ खोड यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत धर्मदाय सहआयुक्तांनी रविवारी शनि मंदिराची पाहणी केली.
शनिचे अर्धपीठ म्हणून प्रसिध्द असलेल्या शनिमंदिराच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. संस्थेने आपल्या पदाचा दुरूपयोग करीत जागा लाटली आहे. मंदिराच्या मालकीच्या जागेवर शाळा बांधण्यात आलेली आहे. तसेच घरेही आहेत. हे अतिक्रमण पाडावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी खेटे मारीत आहेत. मात्र, अद्यापही हा प्रश्न निकाली काढण्यात आलेला नाही. हा वाद त्यांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रारीद्वारे मांडला आहे.
दरम्यान, रविवारी लातूर धर्मदाय सहआयुक्त हार्लेकर यांनी निरीक्षक वानखेडे यांच्यासह शनि मंदिर परिसराची पाहणी केली. शनि मंदिराची जागा किती आहे ? त्याच्यावर किती अतिक्रमण झालेले आहे ? शाळेची इमारत आदींची माहिती त्यांनी संबंधित व्यक्तींना विचारली. त्यांनी केलेल्या पाहणीवरून संस्थानचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येईल, अशी प्राथमिक शक्यता वर्तविली जात आहे. ज्या अर्थी धर्मदास सहआयुक्त यांनी भेट दिली त्यामुळे हा प्रश्न लवकरच निकाली लागणार हे यावरून स्पष्ट होत आहे.. (प्रतिनिधी)