काँग्रेसच्या निरीक्षकांनी केली इच्छुकांची चाचपणी

By Admin | Updated: July 19, 2014 00:46 IST2014-07-19T00:33:11+5:302014-07-19T00:46:59+5:30

हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या वतीने हिंगोली व कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील आ. विवेक बन्सल यांची पक्ष निरीक्षक म्हणून

Inspection by Congress observers | काँग्रेसच्या निरीक्षकांनी केली इच्छुकांची चाचपणी

काँग्रेसच्या निरीक्षकांनी केली इच्छुकांची चाचपणी

हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या वतीने हिंगोली व कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील आ. विवेक बन्सल यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी बन्सल यांनी हिंगोलीत दोन्ही मतदार संघातील इच्छुकांची चाचपणी केली.
विधानसभा निवडणुकीची तयारी काँग्रेसकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील काँग्रेसकडे असलेल्या हिंगोली व कळमनुरी विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून निवडणूक लढऊ इच्छिणारे उमेदवार कोण आहेत, याबाबतची चाचपणी करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव तथा उत्तर प्रदेशातील आ. विवेक बन्सल यांची पक्ष निरीक्षक म्हणून प्रदेश काँग्रेस कमेटीने नियुक्ती केली. त्यानुसार आ. बन्सल व औरंगाबाद येथील पक्षाचे जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर शुक्रवारी हिंगोली दौऱ्यावर आले. त्यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रारंभी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी सर्वांनीच एकमताने आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांचेच नाव सुचविले. त्यानंतर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या आ.बन्सल यांनी मुलाखती घेतल्या. या मतदारसंघातून तब्बल ८ इच्छुकांनी मुलाखती दिल्या व पक्षाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आ. बन्सल यांनी सर्व कार्यकर्त्यांना यासंदर्भातील अहवाल काँग्रेस कमेटीला कळविला जाईल, असे सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस नारायणराव खेडेकर, तालुकाध्यक्ष प्र्रकाश थोरात, प्रकाश देशमुख, डॉ.संतोष टारफे, अ‍ॅड. बाबा नाईक, गजानन कुटे, आबेदअली जहागिरदार, जि. प. सदस्य विनायक देशमुख, सभापती छगन बनसोडे, दुलेखॉ पठाण, संतोष जगताप, संजय जैस्वाल, भीमाशंकर सराफ, ज्ञानेश्वर गोटरे, भैय्या सवनेकर, भागोराव राठोड, जहीरखॉ पठाण, उत्तमराव जगताप आदींची उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी दौरा- बन्सल
याबाबत पक्ष निरीक्षक आ.बन्सल यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोणातून पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी आपल्यावर सोपविली असल्याचे सांगितले. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर याबाबतचा अहवाल पक्ष श्रेष्ठींकडे सोपविणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यकर्त्यांशी केली चर्चा
जिल्ह्यातील हिंगोली व कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आ. विवेक बन्सल आले होते हिंगोलीत.
हिंगोली व कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या पक्ष निरीक्षकपदी आ. बन्सल यांची नियुक्ती.
हिंगोलीत आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याच एकमेव नावाची कार्यकर्त्यांनी केली शिफारस.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढऊ इच्छिणाऱ्या ८ जणांनी दिल्या मुलाखती.
मुलाखतीनंतर आ.बन्सल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षवाढीवर केली चर्चा.
आ.बन्सल अहवाल वरिष्ठांकडे सादर करणार.

Web Title: Inspection by Congress observers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.