अमेरिकेतील अनिवासी संस्थेकडून औरादच्या जलयुक्तची पाहणी
By Admin | Updated: January 9, 2017 23:30 IST2017-01-09T23:29:45+5:302017-01-09T23:30:36+5:30
औराद शहाजानी :जलयुक्त कामाची पाहणी शनिवारी अमेरिकेतील अनिवासी भारतीयांच्या ओव्हरसीस या संस्थेकडून करण्यात आली़

अमेरिकेतील अनिवासी संस्थेकडून औरादच्या जलयुक्तची पाहणी
औराद शहाजानी : तीन वर्षांच्या दुष्काळात निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी औराद शहाजानी ग्रामस्थ व आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलयुक्त कामाची पाहणी शनिवारी अमेरिकेतील अनिवासी भारतीयांच्या ओव्हरसीस या संस्थेकडून करण्यात आली़ आगामी काळात जलयुक्त व पाण्यासंबंधी कामे करण्यासाठी प्राधान्य देण्याची हमी देण्यात आली़
आर्ट आॅफ लिव्हींग, औराद, तगरखेडा, हलगरा, शेळगी, ताडमुगळी, काटेजवळगा या गावातील ग्रामस्थांच्या वतीने गावात जलयुक्तची कामे करण्यात आली़ यात औराद येथील निम्न तेरणा नदीचे चार किमीचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात आले़ याशिवाय हलगरा गावातील ओढ्याचे काम या माध्यमातून झाले़ यासाठी अमेरिकेतील ओव्हरसिस संस्थेच्या माध्यमातून काम करण्यात आले़ अनिवासी भारतीयांच्या या संस्थेकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात़ संस्थेकडून आर्ट आॅफ लिव्हींगच्या जलयुक्त कामासाठी मदत करण्यात आली़
औराद येथील तेरणा नदी हलगरा नाला, शेळजी येथील ओढा या ठिकाणी गेल्या वर्षी उन्हाळ्यात करण्यात आलेल्या कामाची पाहणी या संस्थेचे चेअरमन तथा जलतज्ज्ञ मोहन जिका व सदस्य नागनाराज राव यांनी केली़ जलयुक्तच्या कामामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार नाही़ यासाठी चांगले काम झाले आहे़
याशिवाय आणखी पाण्यासंबंधी कार्यक्रम करण्याची आवश्यकता बोलून दाखवून पुढील वर्षी होणाऱ्या जलयुक्त कार्यास मदत करण्याचे आश्वासन दिले़ सदर संस्था हलगरा येथील अमेरिकेत नोकरी करणारे दत्ता पाटील यांच्यामार्फत हलगरा गावात जलयुक्तसाठी विशेष काम करण्यात आले़