रेल्वेस्टेशन, विमानतळावर २५६ प्रवाशांची तपासणी
By | Updated: November 29, 2020 04:06 IST2020-11-29T04:06:07+5:302020-11-29T04:06:07+5:30
दिल्ली येथून सचखंड एक्स्प्रेसने आलेल्या २२४ प्रवाशांची आरटीपीसीआर पद्धतीने टेस्ट करण्यात आली. शुक्रवारी तपासणी केलेल्या प्रवाशांमध्ये दोन जण ...

रेल्वेस्टेशन, विमानतळावर २५६ प्रवाशांची तपासणी
दिल्ली येथून सचखंड एक्स्प्रेसने आलेल्या २२४ प्रवाशांची आरटीपीसीआर पद्धतीने टेस्ट करण्यात आली. शुक्रवारी तपासणी केलेल्या प्रवाशांमध्ये दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले. चिकलठाणा विमानतळावर शनिवारी ३२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. शुक्रवारी ज्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली होती, त्यामध्ये एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही.
मनपाकडून ६४ हजार रुपये दंड वसूल
औरंगाबाद : महापालिकेने नियुक्त केलेल्या नागरी मित्र पथकाने शनिवारी नागरिकांकडून ६४ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. शहरात मास्क न घालणाऱ्या ९३ नागरिकांकडून ४६ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. रंगारगल्ली येथे सचिन बंब यांनी प्रतिबंधित कॅरिबॅगचा वापर केल्याबद्दल दहा हजार रुपये दंड वसूल केला. रस्त्यावर कचरा टाकणारे आणि जाणाऱ्या नागरिकांकडून दहा हजार रुपये दंड वसूल केला. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी गजानन महाराज मंदिर परिसरात पाहणी करून नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सूचना केली.