मंठ्यात खाजगी दवाखान्यांची पथकाकडून तपासणी

By Admin | Updated: April 6, 2017 23:40 IST2017-04-06T23:37:42+5:302017-04-06T23:40:23+5:30

मंठा : येथील खाजगी क्लिनिक (दवाखाने) यांची तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे.

Inspecting a private dispensary by the team | मंठ्यात खाजगी दवाखान्यांची पथकाकडून तपासणी

मंठ्यात खाजगी दवाखान्यांची पथकाकडून तपासणी

मंठा : येथील खाजगी क्लिनिक (दवाखाने) यांची तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात असून, यामध्ये प्रामुख्याने बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार दवाखान्याची नोंदणी केली आहे काय, तसेच जैविक कचरा व्यवस्थापन मंडळाकडून नोंदणी करून परवानगी घेतली आहे का, याची तपासणी केली जात असल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मंठा शहरातील सध्या सात ते आठ खाजगी दवाखान्यांची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप कांबळे यांनी तपासणी केली असून, ज्यांना क्लिनिक चालवायचे आहे त्यांनी जैविक कचरा व्यवस्थापन मंडळ व बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट १९४९ नुसार त्यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नसता त्या दवाखान्याच्या संचालक डॉक्टरावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप कांबळे यांनी सांगितले. ते म्हणाले शहरात ५० ते ५५ दवाखान्याची १ एप्रिल पासून १३ एप्रिलपर्यंत तपासणी करण्यात येत आहे. याचा अहवाल जिल्हाधिकारी, जालना यांना पाठविण्यात येणार असून, दवाखाना संचालकांना नोटिसा देऊन सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करण्यात येणार आहे.

Web Title: Inspecting a private dispensary by the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.