वसमतमधील स्वच्छतेची पथकाकडून पाहणीं
By Admin | Updated: August 27, 2014 23:39 IST2014-08-27T23:30:50+5:302014-08-27T23:39:10+5:30
वसमत : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत वसमत न.प.ची आज विभागीय पथकाकडून पाहणी करण्यात आली.

वसमतमधील स्वच्छतेची पथकाकडून पाहणीं
वसमत : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत वसमत न.प.ची आज विभागीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. विविध योजना, विकास कामे व शहरातील स्वच्छतेचा आढावा या पथकाचे घेतला.
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान २०१२-१०१३ अंतर्गत विभागीय तपासणी पथकाने शुक्रवारी वसमतला भेट दिली. यात विभागीय उपायुक्त विजयकुमार फड, नगररचनाकार प्रसाद गायकवाड, आरोग्य विभागाचे उपसंचालक भोपे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे किरण पाटील, शिक्षण उपसंचालक बनाटे, नंदा गायकवाड, पाटील, पठाण आदी अधिकाऱ्यांची या पथकात समावेश होता.
पथकप्रमुख महसूल विभागाचे विभागीय उपायुक्त विजयकुमार फड हे आहेत. त्यांच्या पथकाने आज शहराच्या विविध भागास भेट देवून पाहणी केली. वसमत न.प.ची पाणी पुरवठा व्यवस्था, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, जलनिसरत आदींची पाहणी केली. न.प.ने केलेल्या विकास कामांची पाहणी पथकाने केली.
पथकाचे छोटेखानी सत्कार समारंभ वसमत न.प.सभागृहात घेण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी श्रीनिवास कोतवाल, उपमुख्याधिकारी मुजीब पठाण, माजी नगराध्रूख शिवदास बोड्डेवार, अर्जुन सैदाने, शेख इलियास, शाम माळवटकर, बळवंते आदींची उपस्थिती होती.
(वार्ताहर)