घरात घुसून काठ्यांनी मारहाण

By Admin | Updated: May 20, 2014 01:45 IST2014-05-20T01:40:17+5:302014-05-20T01:45:01+5:30

अर्धापूर : शेतीच्या वादातून घरात घुसून लाठा-काठ्यांनी मारहाणीची घटना ९ मे रोजी तालुक्यातील दाभड येथे घडली. याप्रकरणी अर्धापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Inside the house, striking the bricks | घरात घुसून काठ्यांनी मारहाण

घरात घुसून काठ्यांनी मारहाण

 अर्धापूर : शेतीच्या वादातून घरात घुसून लाठा-काठ्यांनी मारहाणीची घटना ९ मे रोजी तालुक्यातील दाभड येथे घडली. याप्रकरणी अर्धापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. दाभड ता. अर्धापूर येथील संभाजी सूर्यवंशी यांची दाभड शिवारात शेती आहे. शेतात जाण्यासाठी गावातील विश्वनाथ सृर्यवंशी यांच्या शेतातून रस्ता आहे. ९ मे रोजी सायंकाळी साडे सहा वाजता नेहमीप्रमाणे संभाजी सूर्यवंशी विश्वनाथ सूर्यवंशी यांच्या शेतातून जात असताना केशव संभा, मारोती संभा, बंटी मारोती, देवानंद उर्फ पिंटू यांनी संगनमत करुन ‘तू आमच्या शेतातून जावू नको, आमच्याविरोधात केलेली कारवाई मागे घे अन्यथा आज सायंकाळी तुझ्या घरी येवून हल्ला करतो, अशी धमकी दिली. यावर काहीही न बोलता संभाजी सूर्यवंशी तसेच निघून गेले. रात्री ८ च्या दरम्यान मुलाबाळासह संभाजी सूर्यवंशी घरी असताना मारोती संभाजी, बंटी मारोती, विकास भगवान, देवानंद, राजू केशव, प्रविण केशव, केशव संभाजी आदी आले, सर्वांनी मिळून संभाजी सूर्यवंशी यांना शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला. तु केस मागे घेत नाहीस, असे म्हणून काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलगा वैजनाथ, राजभोज यांनाही यावेळी मारहाण करण्यात आली. त्याचवेळी संभाजी यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडल्या असता, त्यांनाही मारहाण करुन ढकलून देण्यात आले. दरम्यान, या घटनेची सविस्तर फिर्याद संभाजू सूर्यवंशी यांनी अर्धापूर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी आरोपीविंरुद्ध गुन्हा नोंदविला असून तपास जमादार बी.एस. चव्हाण करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Inside the house, striking the bricks