जप्त रकमेसाठी चौकशी समिती

By Admin | Updated: October 6, 2014 00:11 IST2014-10-06T00:00:00+5:302014-10-06T00:11:45+5:30

हिंगोली :विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कालावधीमध्ये जप्त केलेल्या रकमेच्या चौकशीकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे.

Inquiry Committee for confiscated amount | जप्त रकमेसाठी चौकशी समिती

जप्त रकमेसाठी चौकशी समिती

हिंगोली :विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कालावधीमध्ये जप्त केलेल्या रकमेच्या चौकशीकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे.
रोख रकमेच्या वापरासंदर्भात निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये एसएसटी व फ्लार्इंग स्कॉड पथकाकडून जप्त करण्यात आलेली रक्कम ही कोणत्याही राजकीय पक्षाशी अथवा निवडणुकीशी संबंधित नाही व त्या रक्कमेसंदर्भात एफआयआर सादर केला नसेल तर त्या रक्कमेची चौकशी करून जप्त केलेली रक्कम संबंधितास परत करण्याकरीता हिंगोली जिल्ह्यात तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम कासार यांनी दिली.
या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी सुरेश केंद्रे व जिल्हा कोषागार अधिकार टी. एल. भिसे यांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Inquiry Committee for confiscated amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.