सरकारी खदानींची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:07 IST2017-09-23T01:07:37+5:302017-09-23T01:07:37+5:30
शहरालगत असलेल्या सरकारी गायरानावरील नैसर्गिक डोंगरांची (खदानी) जिल्हा प्रशासनातील काही महाभागांनी व स्टोन क्रशरचालकांनी दाणादाण सुरू केल्याप्रकरणी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सरकारी खदानींची होणार चौकशी
ल्ोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरालगत असलेल्या सरकारी गायरानावरील नैसर्गिक डोंगरांची (खदानी) जिल्हा प्रशासनातील काही महाभागांनी व स्टोन क्रशरचालकांनी दाणादाण सुरू केल्याप्रकरणी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
नियम धाब्यावर बसवून गौण खनिज उत्खननाची परवानगी देण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे अनेक पर्यावरणप्रेमींनी तक्रारी केल्या. महिनाभर आयुक्तांनी त्या प्रकरणातील मुद्दे तपासल्यानंतर चौकशीचे आदेश काढले आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणात खदानी असून, स्टोन क्रशर त्यासाठी परवानगीसह किंवा विनापरवाना डोंगर पोखरण्याचे काम करतात.