नगरपंचायतच्या मागे चौकशीचा ससेमिरा

By Admin | Updated: December 3, 2014 01:17 IST2014-12-03T00:54:57+5:302014-12-03T01:17:12+5:30

केज : येथील नगर पंचायतच्या वतीने ४ कोटींच्या विकास कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार सय्यद माजेदसह चौघांनी उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे केली होती

Inquire after the Nagar Panchayat | नगरपंचायतच्या मागे चौकशीचा ससेमिरा

नगरपंचायतच्या मागे चौकशीचा ससेमिरा


केज : येथील नगर पंचायतच्या वतीने ४ कोटींच्या विकास कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार सय्यद माजेदसह चौघांनी उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे केली होती. त्यानंतर याची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना देऊनही सात महिन्यांपासून ते दिले नाहीत. त्यामुळे १ डिसेंबर रोजी संबंधित अभिलेख्यासह त्यांना अंबाजोगाईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
केज नगरपंचायतीकडे विविध विकास कामांसाठी ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. दलितोत्तर विकास निधी १ कोटी खर्च करण्यात आला. रस्त्यांसाठी ८० लाख रुपये अनुदान, दलित वस्तीच्या विकासासाठी ६० लाख रुपयांचा निधी, विविध कर वसुली निधी ६० लाख रुपये असा एकूण ४ कोटींचा निधी विकास कामांसाठी खर्च करण्यात आला.
दरम्यान, हा निधी खर्च करताना काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. उपोषणही करण्यात आले होते. सय्यद माजेदसह चौघांनी १९ डिसेंबर २०१३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली होती. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी करुन आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र न.प. प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे २४ नोव्हेंबर २०१४ रोजी पुन्हा उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना १ डिसेंबर रोजी दस्तावेजासह हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांचा साधा प्रतिनिधीही अंबाजोगाईच्या कार्यालयात हजर झाला नाही. मुख्याधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे निदर्शनास येते. याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार पंडित म्हणाले, संबंधित अभिलेख्यासह ६ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.

Web Title: Inquire after the Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.