दुग्धोत्पादनासाठी नाविन्यपूर्ण अनुदान
By Admin | Updated: July 28, 2014 00:55 IST2014-07-27T23:52:50+5:302014-07-28T00:55:27+5:30
शिरूर अनंतपाळ : शेतीस दुग्धोत्पादनाच्या पुरक व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नाविन्यपूर्ण अनुदानित योजना सुरु करण्यात आली आहे़
दुग्धोत्पादनासाठी नाविन्यपूर्ण अनुदान
शिरूर अनंतपाळ : शेतीस दुग्धोत्पादनाच्या पुरक व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नाविन्यपूर्ण अनुदानित योजना सुरु करण्यात आली आहे़ योजनेतंर्गत अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ७५ टक्के तर सर्वसाधारण जातीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे़ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने करण्यात आले आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगाव या धरणांमुळे सुपीक जमीन निर्माण झाली आहे़ त्यामुळे दुग्धोत्पादनास मोठा वाव आहे़ त्यासाठी येथील पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़ श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी तालुक्यातील सर्व पशुवैद्यकांची बैठक घेऊन या नाविण्यपूर्ण अनुदानित योजनेची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले़ पशूपालकांना दुधाळ पशूधन गटाचे वाटप करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर शेळीगट, कुक्कुट पालनासाठी पक्षगट यांचेही वाटप करण्यात येणार असल्याने त्यासाठी सुध्दा प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ शेतीबरोबरच दुग्धोत्पादनाचा उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ़ श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे़(वार्ताहर)
या नाविण्यपूर्ण पशुपालन योजनेसाठी एकूण ३ लाख ३५ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे़ यात पशू खरेदीसाठी २ लाख ४० हजार, गोठा बांधण्यासाठी ३० हजार, खाद्यशेडसाठी २५ हजार, चारा कटाई यंत्रासाठी २५ हजार त्याच बरोबर ३ वर्षांसाठी १५ हजार रुपयांचा पशुविमा काढण्यात येणार आहे़