शासनाकडून वाळूजवर अन्याय!

By Admin | Updated: July 17, 2014 01:36 IST2014-07-17T01:26:15+5:302014-07-17T01:36:01+5:30

औरंगाबाद : शहरापासून अवघ्या १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळूज औद्योगिक परिसिराचा झपाट्याने विकास होत आहे.

Injustice to the government by the government! | शासनाकडून वाळूजवर अन्याय!

शासनाकडून वाळूजवर अन्याय!

औरंगाबाद : शहरापासून अवघ्या १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळूज औद्योगिक परिसिराचा झपाट्याने विकास होत आहे. या भागाची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक झाली आहे. मोठ्या ग्रामपंचायतींना एकत्र करून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात यावी, अशी मागणी दहा वर्षांपासून नागरिक करीत आहेत. मात्र, शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सर्वसामान्यांचा आहे.
रोजगारनिर्मितीमुळे वाळूज भागात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वाढती लोकसंख्या छोट्या ग्रामपंचायतींसाठी डोकेदु:खी ठरत आहे. सर्वसामान्य नागरिक आणि उद्योगांना सेवा- सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायती अपयशी ठरत आहेत.
वाळूजला स्वतंत्र नगर परिषद अथवा प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. नगर परिषदांचे वर्गीकरण लोकसंख्येच्या आधारावर केले जाते. त्यात अ, ब, क आणि ड वर्ग, असे वर्गीकरण आहे.
नगर परिषदेसाठी किमान तीस हजारांहून अधिक लोकसंख्येची गरज असते. वाळूज भागातील एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३० हजारांहून अधिक येते. त्यामुळे या भागात अ वर्गातील नगर परिषद स्थापन करण्यात यावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाळूज भागात सुमारे २२ पेक्षा अधिक ग्रामपंचायती आहेत. यातील मोठ्या ग्रामपंचायती फक्त कर वसुली करतात. सुविधा काहीच देत नाहीत, अशी उद्योजकांची ओरड आहे.
या भागात स्वतंत्र नगर परिषद अथवा विकास प्राधिकरण स्थापन केल्यास उद्योजकांचे विविध प्रश्न सुटतील. उद्योजकांना कर कोणालाही द्यावाच लागतो. या भागातील विकासकामांसाठी स्वतंत्र यंत्रणा असल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे उद्योजकांना वाटते.
वाळूज परिसरातील लहान- मोठ्या गावांची अवस्था अत्यंत वाईट आहे. जिकडेतिकडे कचऱ्याचे ढीग, उघड्या नाल्या, नाल्यांवरच घाण, असे विदारक चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. रांजणगाव हा सर्वांत मोठा परिसर; पण या गावातील विविध मुख्य रस्ता सोडला तर अंतर्गत रस्ते बरेच खराब आहेत. अनेक वसाहतींमध्ये पथदिवेच नाहीत. बजाजनगरचीही परिस्थिती खूप चांगली नाही.
२०० खाटांचे रुग्णालय द्या
वाळूज परिसरातील लहान- मोठ्या आरोग्यसेवांसाठी नागरिकांना थेट औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. रात्री- अपरात्री शहरात जाणे कोणालाही परवडत नाही. शासनाने चिकलठाणा भागात २०० खाटांचे एक स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचे काम सुरू केले आहे. याच धर्तीवर वाळूज परिसरातही २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
पाठपुरावा सुरूच आहे
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ. संजय शिरसाट म्हणाले की, या भागात नगर परिषद, रुग्णालय स्थापन करण्यासाठी शासनाकडे आम्ही वारंवार प्रयत्न करीत आहोत.

Web Title: Injustice to the government by the government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.