जखमी घुबडाला पैठणमध्ये जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:24 IST2017-12-22T00:24:33+5:302017-12-22T00:24:37+5:30
पैठण शहरात आढळलेल्या जखमी दुर्मिळ कोठी घुबड पक्षाला येथील नागरिकांनी जीवदान दिले. या घुबडावर येथील पशुधन विकास अधिकारी पांडवे हे उपचार करत असून उपचार पूर्णपणे झाल्यानंतरच या घुबडास मुक्त जंगलात सोडले जाईल, असे वनपाल गोविंद वैद्य यांनी सांगितले.

जखमी घुबडाला पैठणमध्ये जीवदान
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठण शहरात आढळलेल्या जखमी दुर्मिळ कोठी घुबड पक्षाला येथील नागरिकांनी जीवदान दिले. या घुबडावर येथील पशुधन विकास अधिकारी पांडवे हे उपचार करत असून उपचार पूर्णपणे झाल्यानंतरच या घुबडास मुक्त जंगलात सोडले जाईल, असे वनपाल गोविंद वैद्य यांनी सांगितले.
कोठी घुबड हे दुर्मिळ असून हे घुबड लाल, पिवळे, पांढºया रंगाचे आहे. घुबडाचा वड, पिंपळ अशा उंच झाडावर सहवास असतो, अशी माहिती वन्यजीव अधिकारी पोपट बर्डे यांनी दिली.
पैठणचे माजी नगराध्यक्ष अनिल घोडके यांच्या रामनगर येथील घराच्या गच्चीवर जखमी अवस्थेत हे घुबड आढळून आले. घोडके यांनी तात्काळ वन विभाग, वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना बोलावून घुबड त्यांच्या ताब्यात दिले.
पूर्ण बरे झाल्यावरच या घुबडास पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव जंगल परिसरातील निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येणार असल्याचे पी.एम. बरडे यांनी सांगितले. हे घुबड पाहण्यासाठी सकाळी पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोठी गर्दी झाली होती.