कुख्यात जॉन तीर्थेचा भाऊ सतीश तलवारीसह अटकेत

By Admin | Updated: May 19, 2015 00:52 IST2015-05-19T00:32:28+5:302015-05-19T00:52:34+5:30

औरंगाबाद : जयभवानीनगर, जिजामाता कॉलनीतील आठ वाहने जाळणारा प्रमुख आरोपी जॉन ऊर्फ भारत शंकर तीर्थे याला त्याच्या साथीदारासह रविवारी रात्री मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.

Injured John Tirtha's brother Satish Talwar arrested | कुख्यात जॉन तीर्थेचा भाऊ सतीश तलवारीसह अटकेत

कुख्यात जॉन तीर्थेचा भाऊ सतीश तलवारीसह अटकेत


औरंगाबाद : जयभवानीनगर, जिजामाता कॉलनीतील आठ वाहने जाळणारा प्रमुख आरोपी जॉन ऊर्फ भारत शंकर तीर्थे याला त्याच्या साथीदारासह रविवारी रात्री मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. जॉनचा मोठा भाऊ सतीश (२६, रा. जयभवानीनगर) यास तलवार घेऊन फिरत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले की, जयभवानीनगर परिसरात गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक जी. के. कल्याणकर गस्तीवर असताना सतीश तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचा शोध सुरू केला असता तो मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात फिरत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच तो पळू लागला. पोहेकॉ. मच्छिंद्र ससाणे, भीमराव आरके, गोविंद पचरंडे, प्रभाकर राऊत यांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास पकडले. त्याने आपल्या कमरेत पँटमध्ये तलवार लपवून ठेवल्याचे दिसले.
इंजिन नादुरुस्त
औरंगाबाद : नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेसचे इंजिन सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास बदनापूर-करमाडदरम्यान नादुरुस्त झाले. त्यामुळे तब्बल ३० ते ४० मिनिटे ही रेल्वे उशिराने धावली.
यावेळी इंजिनचालकांनी अथक प्रयत्न केल्याने इंजिन दुरुस्त झाले आणि दुसरे इंजिन नेण्याची वेळ टळली. त्यामुळे प्रवाशांचीही गैरसोय टळली.

Web Title: Injured John Tirtha's brother Satish Talwar arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.