पतीकडून घटस्फोटाची मागणी करणार्या महिलेची स्त्री मुक्ती संघटना आणि वाशी पोलिसांच्या मदतीने नातलगांच्या तावडीतून मंगळवारी सुटका करण्यात आली.
स्त्रीमुक्ती संघटनेचा पुढाकार; विवाहितेची सुटका
वाशी : पतीकडून घटस्फोटाची मागणी करणार्या महिलेची स्त्री मुक्ती संघटना आणि वाशी पोलिसांच्या मदतीने नातलगांच्या तावडीतून मंगळवारी सुटका करण्यात आली असून, तिला आता पुण्यातील स्त्री मुक्ती संघटनेच्या स्वाधिन करण्यात येणार आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंब येथील या विवाहितेचे लग्न वाशी येथील प्रतिष्ठित कुटुंबातील युवकासोबत पंधरा वर्षांपूर्वीझाले होते.विवाहानंतर हे दाम्पत्य व्यवसायानिमित्त पुणे येथे गेले होते.तेथे तीन-चार वेळा पतीला व्यवसायात अपयश आल्यामुळे सदर विवाहिता स्वत:च नोकरी करून घरगाडा चालवित होती.दरम्यान, सदर विवाहितेने काही कारणामुळे पतीकडून घटस्फोट मागितला होता.यासाठी तिने पुणे येथील टिळक रोडवरील स्त्रीमुक्ती संघटनेकडेही मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.याची कुणकूण पतीसह या विवाहतेचा भाऊव सासरच्या मंडळींना लागली.त्यामुळे २८डिसेंबर रोजी या विवाहितेचा भाऊ, दीर व पती यांनी तिला बाहेर जेवायला जायचे आहे, असे म्हणून पुणे (चाकण)येथील घरातून बाहेर काढले.परंतु, आपली जीप पुण्याच्या बाहेर जात असल्याचे लक्षात आल्यामुळे तिने याबाबत विचारणा केली.मात्र, दमदाटी करून तिला गप्प राहण्यास सांगितले. यानंतर सदर विवाहितेने रस्त्यात जीपमधून उडी मारण्याचाही प्रयत्न केला.मात्र, तिला ते शक्य झाले नाही. अखेर या सर्वांनी तिला वाशी येथील घरी आणले.दरम्यान, येथे पोहोंचेपर्यंत सदर महिलेने स्त्री मुक्ती संघटनेच्या पदाधिकार्यांना भ्रमणध्वनीवरून संदेश पाठवून आपणाला मनाविरूध्द वाशी येथे नेले जात असल्याचे कळविले होते. स्त्री मुक्ती संघटनेने याबाबत तातडीने उस्मानाबाद पोलिसांना कळविले.प्रकरण नाजूक असल्यामुळे हे प्रकरण महिला समुपदेशन केंद्राकडे सोपविण्यात आले.२९डिसेंबर रोजी वाशी, कळंब व उस्मानाबाद येथील महिला तक्रार निवारण केंद्रातील समुपदेशक कोमल धनवडे, संध्या तेरकर, वर्षाझगडे व सुप्रिया फारणे यांनी वाशी येथील पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांची भेट घेऊन याप्रकरणी मदत करण्याची विनंती केली.प्रकरणाचे गांभिर्यओळखून ठोंबरे यांनीही स्थानिक पोलिस कर्मचार्यांना त्यांच्या मदतीसाठी दिले. या सर्वांनी सदर विवाहितेच्या घरी जावून चौकशी केली असता ती घरातच आढळून आली.पोलिस व महिला समुपदेशन केंद्रातील महिलांना पाहताच या विवाहितेने हंबरडा फोडला. यावेळी तिने मला सासरी रहायचे नाही, असे सांगून या कर्मचार्यांसोबत थेट पोलिस ठाण्यात आली. या ठिकाणी ठोंबरे यांच्याकडे तिने आपली व्यथा मांडल्यानंतर तिचा जबाब घेऊन तिला तक्रार निवारण केंद्रातील समुपदेशकांच्या स्वाधिन करण्यात आले. सदर महिलेस आता पुण्यातील स्त्री मुक्ती संघटनेकडे पाठविले येणार आहे. (वार्ताहर)
Web Title: Initiative of Women's Liberation Organization; Marriage Relief