रसायनशास्त्रातील इंगळे यांचे योगदान अविस्मरणीय
By | Updated: December 5, 2020 04:08 IST2020-12-05T04:08:07+5:302020-12-05T04:08:07+5:30
औरंगाबाद : रसायनशास्त्रातील प्रा. डी.बी. इंगळे यांचे योगदान अविस्मरणीय आहे, अशा शब्दांत अनेक मान्यवरांनी त्यांचे कार्यकर्तृत्व, प्रामाणिक सेवाभावीवृत्तीला उजाळा ...

रसायनशास्त्रातील इंगळे यांचे योगदान अविस्मरणीय
औरंगाबाद : रसायनशास्त्रातील प्रा. डी.बी. इंगळे यांचे योगदान अविस्मरणीय आहे, अशा शब्दांत अनेक मान्यवरांनी त्यांचे कार्यकर्तृत्व, प्रामाणिक सेवाभावीवृत्तीला उजाळा दिला.
रसायनशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख तथा आदर्श शिक्षक प्रा. डी.बी. इंगळे यांच्या स्मरणार्थ ३० नोव्हेंबर रोजी ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव सोळुंके यांनी प्रा. इंगळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बहुजन समाजातील शिकणाऱ्या पहिल्या पिढीतील तरुणांना शिक्षणासाठी केलेली मदत व प्राेत्साहन विसरता येणार नाही, अशा शब्दांत तरुण पिढीला त्यांनी जाणीव करून दिली. या व्याख्यानात बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रा. सतीश पाटील व पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेचे वैज्ञानिक डॉ. अमोल कुलकर्णी यांनीही प्रा. इंगळे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. राम माने यांनी प्रा. इंगळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संशोधन कार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास प्रा. इंगळे यांचे ११५ विद्यार्थी व अनुयायांनी ऑनलाइन हजेरी लावली होती. डॉ. यशवंत देशपांडे, डॉ. बी.आर. अरबाड, डॉ. लांडे, डॉ. किरण जाधव, डॉ. अण्णा निकाळजे, डॉ. सुरेखा इंगळे, डॉ. अविनाश माने, डॉ. वडगावकर, शांता पवार आदींनी इंगळे यांच्या आठवणींना उजाळा दिला.