शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती अनुपलब्ध

By admin | Updated: August 25, 2014 01:39 IST

वडवणी : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वडवणी तहसीलमध्ये निराधारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र वडवणी तालुक्यात एकूण किती निराधार आहेत?

वडवणी : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वडवणी तहसीलमध्ये निराधारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र वडवणी तालुक्यात एकूण किती निराधार आहेत? याची माहिती तहसीलमध्ये अनुपलब्ध असल्याने संताप व्यक्त होत आहे. तहसीलदारही टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याने माहिती मागायची कोणाकडे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.१३ आॅगस्ट रोजी वडवणी तालुक्यातील कान्हापूर येथील ८० वर्षीय रुक्मीणबाई सूर्यभान सरगर यांना आपले प्राण गमवावे लागले होते तर दोन महिन्यापूर्वी बँकेत आलेल्या पद्मीनबाई जावळे यांचाही बँकेच्या पायऱ्यावरच मृत्यू झाला होता. निराधारांचा गंभीर प्रश्न असतानाही याकडे तहसीलदार मात्र दुर्लक्ष करीत आहेत. वडवणी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेत किती लाभार्थी आहेत? याची माहिती आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे तहसीलदार एन.जी. झंपलवाड यांनी सांगितले. ही माहिती माझ्याकडे नसते, दुसऱ्यांना विचारा, अशी टोलवाटोलवीची उत्तरेही झंपलवाड देत असल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या वतीने प्रत्येक निराधार लाभार्थ्याला त्याचे नाव यादीत आले किंवा नाही हे त्याच्या घरी पत्र पाठवून कळविले जाते. मात्र वडवणी तहसीलच्या मनमानी कारभारामुळे असा कुठलाही प्रकार येथे होत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळेच रुक्मीणबाई सरगर यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या दिवशीपासून आजपर्यंत कुठलीही काळजी वडवणी तहसीलच्या वतीने घेतली जात नसल्याचे उघड झाले आहे. तहसीलदार झंपलवाड मात्र निराधारांना ‘वेटींग’वर ठेवून त्यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप लाभार्थ्यांतून होत आहे. (वार्ताहर)