जायकवाडी धरणात येणारी आवक निम्म्याने घटली; १२ हजार ८२१ क्युसेक विसर्ग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:40 PM2020-09-10T19:40:29+5:302020-09-10T19:42:12+5:30

स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने विश्रांती घेतली, तर दुसरीकडे उर्ध्व भागातील धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे

The inflow to Jayakwadi Dam has halved; 12 thousand 821 cusec discharge started | जायकवाडी धरणात येणारी आवक निम्म्याने घटली; १२ हजार ८२१ क्युसेक विसर्ग सुरु

जायकवाडी धरणात येणारी आवक निम्म्याने घटली; १२ हजार ८२१ क्युसेक विसर्ग सुरु

googlenewsNext

पैठण : धरणात येणारी आवक निम्याने घटल्याने धरणातून होणारा विसर्ग गुरूवारी ९१३२ क्युसेक क्षमतेने घटविण्यात आला. बुधवारी धरणातून २१९५३ क्युसेक विसर्ग सुरू होता, गुरूवारी हा विसर्ग १२८२१ क्युसेक इतका करण्यात आला. विसर्ग घटविण्यासाठी एक फुटाने सुरू असलेले आठ दरवाजे पुन्हा अर्धाफुटावर खाली घेण्यात आले.

स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने विश्रांती घेतली, तर दुसरीकडे उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडीसाठी होणारे विसर्ग कमी करण्यात आल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक घटली. बुधवारी १६००० क्युसेक अशी आवक होती तर गुरूवारी ८२८६ क्युसेक इतकी आवक सुरू होती. यामुळे एक फूटाने वर उचलून विसर्ग सुरू असलेले धरणाचे आठ दरवाजे अर्धाफूट खाली घेऊन विसर्ग कमी करण्यात आल्याचे धरण नियंत्रण कक्षातून अभियंता बंडू अंधारे यांनी सांगितले.

गुरुवारी धरणाचे १८ दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून गोदावरी पात्रात ९५३२ क्युसेक व जलविद्युत केंद्रातून १५८९ क्युसेक असा विसर्ग सुरू होता. डावा कालवा १२०० तर उजव्या कालव्यातून ६००  क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचा जलसाठा ९८.२३% झाला आहे. सध्या जायकवाडीत  मुळा धरणातून २५०० व नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून सोडलेले ४०३२ क्युसेक पाणी दाखल होत आहे. आवक घटली तर विसर्ग कमी करण्यात येतील असे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

Web Title: The inflow to Jayakwadi Dam has halved; 12 thousand 821 cusec discharge started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.