उद्या इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:21 IST2017-08-12T00:21:15+5:302017-08-12T00:21:15+5:30
रविवारी, १३ आॅगस्ट रोजी दुपारी १ वा. देशाच्या माजी पंतप्रधान लोहकन्या स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळा श्रीहरी पॅव्हेलियन, शहानूरमियां दर्ग्याजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

उद्या इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : येत्या रविवारी, १३ आॅगस्ट रोजी दुपारी १ वा. देशाच्या माजी पंतप्रधान लोहकन्या स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळा श्रीहरी पॅव्हेलियन, शहानूरमियां दर्ग्याजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त उद्या १२ आॅगस्ट रोजी रात्री ८ वा. काँग्रेसचे नेते व्यापारी बांधवांच्या भावना ऐकून घेणार आहेत.
नंदकिशोर कागलीवाल यांच्या पुढाकाराने व्यापाºयांची ही बैठक होत आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे निर्माण झालेले विविध प्रश्न काँग्रेसचे नेते ऐकून घेतील.
श्रीहरी पॅव्हेलियनमधला कार्यक्रम १३ आॅगस्ट रोजी दुपारी १ वा. सुरू होईल. तो अडीच तासांत संपेल. तत्पूर्वी काँग्रेसचे नेते सकाळी १० वा. मोतीवाला कॉलनीत मुस्लिम बांधवांच्या भावना ऐकून घेतील. आज एका पत्रपरिषदेत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली.
यावेळी आ. सुभाष झांबड, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, माजी आ. डॉ. कल्याण काळे, इब्राहिम पठाण, अकिफ रजवी, प्रभाकर मुठ्ठे पाटील, अतिश पितळे आदींची उपस्थिती होती.
इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते होईल. ते १२ रोजीच सायंकाळी ७.३५ वा. दिल्लीहून औरंगाबादला येत
आहेत.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांची या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील.