भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव सोमवारी औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:41 IST2017-12-16T00:41:32+5:302017-12-16T00:41:48+5:30
व्हेरॉक करंडक औद्योगिक आणि आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी वनडे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव सोमवारी औरंगाबादेत येणार आहे.

भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव सोमवारी औरंगाबादेत
औरंगाबाद : व्हेरॉक करंडक औद्योगिक आणि आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी वनडे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव सोमवारी औरंगाबादेत येणार आहे. केदार जाधव याने ३७ एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना ७९७ धावा ठोकल्या आहेत. त्यात २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. १२० धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
त्याच प्रमाणे ९ टष्ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात त्याने १२२ धावा केल्या. त्यात ५८ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. सोमवारी दुपारी ३ वाजता होणाºया व्हेरॉक करंडकाच्या बक्षीस वितरणास केदार जाधव याच्यासह महापौर नंदकुमार घोडेले, स्पेशल इन्स्पेक्टर जनरल मिलिंद भारंबे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याचे व्हेरॉक समूहाचे एव्हीपी-ईआर सतीश मांडे आणि स्पर्धा सचिव राहुल टेकाळे यांनी कळवले आहे.