शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबादेत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; विविध संघटनांचा बंदला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:34 IST

Bharat Bandha , Agriculture Bills केंद्रीय किसान समन्वय समिती व जिल्ह्यातील कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळी ११.३० वाजता दिल्ली गेट येथे रास्ता रोको करण्यात आला.

ठळक मुद्देसरकारी कर्मचारी, व्यापारी, कामगार संघटना सामील

औरंगाबाद: केंद्रीय कृषी कायदे रद्द  करण्याच्या  मागणीसाठी  दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिलेल्या आजच्या भारत बंदच्या हाकेला औरंगाबादेत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. शेतकरी बहुल भागात उत्स्फूर्त बंद पाळला गेला आहे. आयुक्तलय आणि जिल्हाधिकारी कार्यलयावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक चौकात पोलीस आहेत. 

शहरातील जाधववाडीत पालेभाज्या आडत बाजार बंद आहे. पण काही शेतकऱ्यांनी भाज्या विक्रीला आणल्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये तुरळक गर्दी दिसून आली. सिडको, हडको, रोशनगेट, शहागज, सराफा बाजार, मछली खडक, गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट येथे काही दुकाने सुरू असल्याचे दिसून आली.  बाजारपेठ नियमित सुरू आहेत. बहुतांश राजकीय  पक्ष, सामाजिक संघटना, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसह उद्योगातील कामगार, व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला.

केंद्रीय किसान समन्वय समिती व जिल्ह्यातील कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळी ११.३० वाजता दिल्ली गेट येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलक समोरसमोर आले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या समितीतीत अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वराज अभियान, आम आदमी पार्टी,मार्क्सवादी कम्युनिस्ट, आयटक, सीटू, श्रमिक मुक्तीदल, हिंद मजदूर सभा, व्हिडीओकाॅन ग्रुप एम्पाॅईज युनियन, भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियनचा सहभाग आहे.  

आज सकाळी १० ते ५ पर्यंत रिक्षा बंदभारत बंद अंतर्गत ८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत औरंगाबाद शहरातील रिक्षा बंद राहतील, असे ऐक्टू प्रणीत लालबावटा रिक्षाचालक कामगार युनियन व संयुक्त रिक्षाचालक कृती समितीने जाहीर केले आहे. कॉम्रेड बुद्धिनाथ बराळ व निसार अहमद यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

बँक संघटनांचा पाठिंबाबंदला ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे. असोसिएशनचे देशभरातील ४ लाखांपेक्षा अधिक सभासद बिल्ला परिधान करून काम करतील.  यादिवशी होणाऱ्या निदर्शने, धरणे, मोर्चात बँक कर्मचारी सहभागी होतील. शेतकऱ्यांना बळ देणे, ही बँक संघटनेची भूमिका असल्याचे संघटनेचेे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

‘बुलंद छावा’चा पाठिंबा बुलंद छावा मराठा युवा संघटनेने बंदला पाठिंबा दिला आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष मनोज गायके पाटील आणि सुरेश वाकडे यांनी ही माहिती कळविली. 

भूवैज्ञानिकांचा पाठिंबा जिऑलाॅजीकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या भूवैज्ञानिकांच्या संघटनेचे पदाधिकारीही दिल्लीकडे रवाना होणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष कुणाल राऊत यांनी कळविले आहे. 

‘माफदा’चा पाठिंबा महाराष्ट्र फर्टीलायझर पेस्टीसाईड  सीड्स डिलर्स असोसिएशनने (माफदा) मंगळवारी विक्री बंद ठेवण्याचे आवाहन राज्यातील खते, औषधी, बियाणे विक्रेत्यांना करण्यात केले आहे. राज्याध्यक्ष जगन्नाथ काळे,  प्रकाश मुथा, विपिन कासलीवाल यांनी  कळवले आहे.  

मराठा क्रांती मोर्चाभारत बंदमध्ये मराठा क्रांती मोर्चा सहभागी होणार असल्याचे पत्रक जारी केले. या पत्रकावर प्रा. चंद्रकांत भराट, किशोर चव्हाण, डॉ. शिवानंद भानुसे, मनोज गायके, प्रदीप हार्दे, रमेश गायकवाड, ॲड. रेखा वाहटुळे, रेणुका सोमवंशी  आदींची नावे आहेत.

ऑल इंडिया लॉयर्स युनियनऑल इंडिया लॉयर्स युनियनने बंदला पाठिंबा दर्शविला आहे. याला केंद्र शासन जबाबदार आहे, असे ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वावळकर आणि सचिव चंद्रकांत भोजगर यांनी म्हटले आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर एसटीची खबरदारीभारत बंदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर व जिल्ह्यात प्रवाशांचा प्रतिसाद पाहून एसटी आपल्या बसगाड्या सोडणार असल्याची माहिती एसटीचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.  तसेच औरंगाबाद येथील मध्यवर्ती, सिडको बसस्थानक, ग्रामीण भागातील आगाराच्या सुरक्षेसाठी संबंधित पोलीस ठाण्यांना कळविल्याचेही अरुण सिया यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती