स्वतंत्र मराठवाडा राज्य झालेच पाहिजे-जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2017 00:39 IST2017-06-26T00:37:32+5:302017-06-26T00:39:31+5:30
जालना :मराठवाडा स्वतंत्र राज्य झालेच पाहिले, असा सूर स्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीच्यावतीने येथे रविवारी आयोजित परिसंवादात उमटला.

स्वतंत्र मराठवाडा राज्य झालेच पाहिजे-जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : संयुक्त महाराष्ट्रात राहून मराठवड्याचा विकास होऊच शकत नाही. त्यामुळे मराठवाडा स्वतंत्र राज्य झालेच पाहिले, असा सूर स्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीच्यावतीने येथे रविवारी आयोजित परिसंवादात उमटला.
स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित खुल्या परिसंवादात माजी उद्योग सचिव जे. के. जाधव, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, शेतीतज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, पाणीतज्ज्ञ प्रा. अवसरमोल, प्रा. जमादार, प्रा.बाबा उगले, शंकरराव नागरे, गणेशलाल चौधरी, प्रकाश जैन, गजानन भांडवले, कवठेकर, अॅड. प्रदीप देशमुख यांनी सहभाग घेतला.
जाधव म्हणाले, मराठवाड्यावर सुरुवातीपासूनच अन्याय होत आला आहे. मराठवाड्याला मुख्यमंत्री पदाची संधी असतानाही पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी ज्या पद्धतीने विकास केला, तसा आपल्या मराठवाड्यातील नेत्यांनी केला नाही. मराठवाड्याच्या अनुशेषाचा विचार केल्यास प्रती व्यक्ती एक लाखांचा अनुशेष बाकी आहे. सव्वा दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मराठवाड्याला अनुशेषातूनच मोठा विकास करता येईल. छोटे राज्य, मोठा विकास या संकल्पनेवर आधारित स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी या पुढे व्यापक चळवळ उभी केली जाईल. त्यासाठी युवकांनी पुढाकार पेटून उठायला हवे. यापुढे ग्रामपंचयातींना स्वतंत्र मराठवाडा राज्याचे ठराव घेण्यास सांगायचे. लोकप्रतिनिधींना भेटून स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी राजकीय पातळीवर भूमिका मांडण्यास भाग पाडायचे, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची भेट घेऊन स्वतंत्र मराठवाडा राज्याबाबत भूमिका मान्यवरांनी मांडली.