स्वातंत्र्यदिनी युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:58 IST2017-08-17T00:58:02+5:302017-08-17T00:58:02+5:30
घरासमोर केलेले कंपाऊंड नगर पालिकेने सूडबुध्दीने पाडल्याच्या विरोधात स्वातंत्र्य दिनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न येथील नवनाथनगर भागात राहणाºया बाळासाहेब राठोड याने केला

स्वातंत्र्यदिनी युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : घरासमोर केलेले कंपाऊंड नगर पालिकेने सूडबुध्दीने पाडल्याच्या विरोधात स्वातंत्र्य दिनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न येथील नवनाथनगर भागात राहणाºया बाळासाहेब राठोड याने केला. ही घटना नगर पालिकेसमोर घडली. पोलिसांनी राठोड याला ताब्यात घेतले.
नवनाथ नगर भागातील बाळासाहेब भगवान राठोड यांनी त्यांच्या घरासमोर बांधलेले कंपाऊंड विनापरवाना असल्याचे कारण देत नगर पालिकेने कसल्याही प्रकारची नोटीस न देता सदरील कंपाऊंड अचानक पाडून टाकले. तसेच शहरातील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र याकडे नगर पालिका व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले. मंगळवारी झेंडावंदन होताच राठोड याने अंगावर डिझेल ओतण्यास सुरूवात केली. यावेळी जवळ असणाºया कर्मचाºयांनी त्याला रोखले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस शिपाई अशोक दुभाळकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.