शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गुलमंडीवर आठ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य; वडिलांनी जाब विचारताच जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:36 IST

सिटी चौक ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : गुलंमडी परिसरातील एका मिठाईच्या दुकानासमोर आठ वर्षीय चिमुकली उभी असताना एका अनोळखी तरुणाने जवळ येत तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्याविषयी चिमुकलीच्या वडिलांनी जाब विचारताच आरोपसह त्याच्या साथीदाराने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार १३ सप्टेंबरला सायंकाळी ९ वाजता घडला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यातंर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सिटी चौक पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आठ वर्षीय चिमुकली आई-वडिलांसोबत गुलमंडी परिसरात आली होती. एका मिठाईच्या दुकानासमोर अनोळखी तरुणाने तिच्यासोबत अश्लील प्रकार केला. त्यामुळे चिमुकली प्रचंड घाबरली. हे पाहून तिच्या वडिलांनी अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणास याविषयी जाब विचारला तेव्हा त्याने मला लहान मुली आवडतात, असे प्रत्युत्तर दिले. त्यावर चिमुकलीच्या वडिलाने माझ्या मुलीला हात कसा लावलास, असा जाब विचारला तेव्हा त्याठिकाणी दुसरा अनोळखी तरुण आला. त्याने मी दादा आहे इथला. तू मला ओळखत नाहीस का, असे बाेलून मुलीच्या वडिलास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दाम्पत्याने सिटी चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यावरून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

दोन आरोपी अटकेतसिटी चौक पोलिसांनी संतोष मगरे व सचिन साबळे (रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) या दोघांना अटक केल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मनिषा हिवराळे यांनी दिली. या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी