शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

वाहनवाढीने आरटीओ कार्यालय मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:51 PM

वाहनांच्या वाढत्या संख्येने आरटीओ कार्यालय मालामाल होत आहे, औरंगाबाद विभागातील औरंगाबादसह जालना, बीडमध्ये २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात वाहन नोंदणीत १५.३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी अवघ्या ९ महिन्यांत २३६ कोटींचा महसूल आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत जमा झाला आहे. डिसेंबरपर्यंत तब्बल १२२ टक्के महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट कार्यालयाने पूर्ण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वाहनांच्या वाढत्या संख्येने आरटीओ कार्यालय मालामाल होत आहे, औरंगाबाद विभागातील औरंगाबादसह जालना, बीडमध्ये २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात वाहन नोंदणीत १५.३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी अवघ्या ९ महिन्यांत २३६ कोटींचा महसूल आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत जमा झाला आहे. डिसेंबरपर्यंत तब्बल १२२ टक्के महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट कार्यालयाने पूर्ण केले आहे.औरंगाबाद आरटीओ कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड अशी तीन जिल्हे आहेत. २०१६-१७ या आर्थिक वर्षात या तीन जिल्ह्यांत ९० हजार ८८७ नव्या वाहनांची नोंद झाली होती. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरदरम्यान एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ७६ हजार ८७३ वाहनांची नोंद झाली.गतवर्षीच्या तुलनेत दर महिन्याला १ हजार ४० वाहनांची अधिक नोंदणी होत आहे. परिणामी महसुलामध्येही चांगलीच वाढ होत आहे. या तीन जिल्ह्यांतील वाहनांची संख्या १८ लाख ६२ हजार ९०८ वर पोहोचली आहे, तर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील वाहनांची संख्या १२ लाख ६० हजार ७९२ इतकी आहे.तीन जिल्हे मिळून २०१७-१८ या आर्थिक वर्षात २६९ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये डिसेंबरपर्यंत १९९ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट होते; परंतु यापेक्षा अधिक महसूल गोळा करण्याचा विक्रम विभागाने केला आहे. १२२ टक्के महसूल वसूल झाला आहे.विशिष्ट नंबरला पसंतीमागील वर्षी ४ हजार ६५१ पसंती क्रमांकातून (चॉईस नंबर) ३ कोटी ६७ लाख रुपये प्राप्त झाले, तर २०१७ मध्ये ४ हजार १८० पसंती क्रमांक गेले. यातून ३ कोटी ४४ लाख १५ हजार रुपयांचा महसूल मिळाला, तर दंडाच्या माध्यमातून ५० कोटी २ लाख रुपयांचा महसूल जमा झाला.उद्दिष्ट पूर्ण४वाहन नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. जवळपास १५.३० टक्के वाढ आहे. आरटीओ कार्यालय आणि विभाग दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल जमा करीत आहे, ही चांगली बाब आहे. मराठवाड्यातील हा विभाग उद्दिष्ट पूर्ण करण्यात सर्वात पुढे आहे.-सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी