गुणवत्तेचा वाढता आलेख
By Admin | Updated: June 3, 2014 00:44 IST2014-06-02T23:50:12+5:302014-06-03T00:44:12+5:30
संजय तिपाले , बीड कॉपीमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती; परंतु बीड जिल्ह्याने ही प्रतिमा पुसून गुणवत्तेत भरारी घेण्यास सुरुवात केली आहे़

गुणवत्तेचा वाढता आलेख
संजय तिपाले , बीड कॉपीमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती; परंतु बीड जिल्ह्याने ही प्रतिमा पुसून गुणवत्तेत भरारी घेण्यास सुरुवात केली आहे़ मागील पाच वर्षांत जिल्ह्याच्या गुणवत्तेचा आलेख चढताच राहिला आहे़ यावर्षीही बीडने ९२़३६ टक्के गुणांसह विभागात आपले वर्चस्व निर्माण केले आहे़ बीड जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी म्हटले की, अनेकजण नाक मुरडतात़ कॉप्यांच्या सुळसुळाटाने गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते; परंतु बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आता ही ओळख पुसण्यास सुरुवात केली आहे़ त्यानुषंगाने कॉपीमुक्तीचा नाराही सातत्याने घुमत आहे़ सामाजिक संस्था, शिक्षण विभागाने कॉपीमुक्तीसाठी प्रयत्न केले़ त्याचा च परिणाम म्हणून आता बीड जिल्ह्यातील विद्यार्थी स्वत:ची गुणवत्ता प्रामाणिकपणे सिद्ध करण्यासाठी सरसावू लागले आहेत़ मागील पाच वर्षांतील गुणवत्तेवर प्रकाशझोत टाकल्यावर हे स्पष्ट होते की, आता बीडचे विद्यार्थीही मागे राहिले नाहीत़ २०१० मध्ये जिथे जिल्ह्याचा एकूण निकाल ७१़७४ टक्के इतका खाली होता तो २०१४ मध्ये ९२़३६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे़ जिल्ह्याची वाटचाल कॉपीतून कॉपीमुक्तीकडे सुरु आहे़ मागील वर्षी जिल्ह्याचा निकाल ८८.४४ टक्के होता. या वर्षी त्यात तब्बल १२ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. गुणवत्तेत बीड जिल्ह्याने विभागात आपले स्थान भक्कम केले आहे़ विभागात अव्वल स्थान पटकाविणार्या बीडने यावर्षीही आपले स्थान कायम राखण्यात यश मिळविले. त्यामुळे जिल्ह्यातील मुलं हुशारच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे़ बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांच्या यशाचा आलेख कायम राखण्याचे आव्हान यापुढे पेलवावे लागणार आहे़ प्राध्यापकांना श्रेय गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बारा टक्के निकाल अधिक लागला आहे़ बीडमध्ये वर्षभर अध्ययन व अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे केले जाते़ सराव परीक्षा होतात, प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे वैयक्तिक लक्ष देतात़ त्यामुळेच बीड जिल्ह्याने घवघवीत यश मिळविले आहे. मुली एकाग्रतेने अभ्यास करतात त्यामुळे त्या मुलांना मागे टाकू शकल्या. या यशाचे श्रेय प्राध्यापकांबरोबरच पालकांनाही जाते, अशी प्रतिक्रिया बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वर्षनिकाल २०१०७१़७४ २०११७८़७७ २०१२७६़२१ २०१३८८़४४ २०१४९२़३६ जिल्ह्यात बीड तालुक्याची सरशी बीड जिल्ह्याच्या एकूण निकालात बीड तालुक्याने दणदणीत यश संपदान करुन छाप सोडली़ बीड तालुक्याने ९४़२० टक्के निकाल लागला आहे़ त्यापाठोपाठ गेवराई व वडवणी तालुक्याचा ९४़१८ टक्के इतका निकाल लागला़ ९३़७४ टक्के मिळवून केज तालुक्याने तिसर्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. धारूर सर्वात तळाशी आहे. धारूरचा निकाल फक्त ८६.७६ टक्के इतका आहे.