गुंडगिरी, असुरक्षिततेमुळेच मतांचा टक्का वाढेना!

By Admin | Updated: September 27, 2014 23:45 IST2014-09-27T23:45:14+5:302014-09-27T23:45:14+5:30

बीड : मतदानयादीत नाव नोंदविण्यापासून ते मतदानाचा हक्क बजावण्यापर्यंत सामान्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते़ पन्नास ते साठ टक्के मते घेऊन निवडून

Increasing the percentage of votes due to bullying, insecurity? | गुंडगिरी, असुरक्षिततेमुळेच मतांचा टक्का वाढेना!

गुंडगिरी, असुरक्षिततेमुळेच मतांचा टक्का वाढेना!


बीड : मतदानयादीत नाव नोंदविण्यापासून ते मतदानाचा हक्क बजावण्यापर्यंत सामान्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते़ पन्नास ते साठ टक्के मते घेऊन निवडून येणारे उमेदवार पाच वर्षे शंभर टक्के जनतेवर अधिराज्य गाजवतात़ हे थांबविण्यासाठी मतांचा टक्का वाढला पाहिजे़ गुंडगिरी व असुरक्षिततेमुळेच लोकशाहीने प्रदान केलेल्या सर्वोच्च अधिकाराचा वापर मतदार करत नाहीत, असा सूर ‘लोकमत’ आयोजित परिसंवादात शनिवारी उमटला़
लोकमतच्या जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या परिसंवादासाठी यावेळी विषय होता मतदार जागृतीचा़ अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ अजित देशमुख, डॉ़ संजय वीर, प्रा़ हमराज ऊईके, ज्ञानदेव काशिद, पूजा जोशी, पूजा मागदे, धनश्री पुरी, सुषमा गोंडे यांनी सहभाग घेतला़
मतदानजागृती ही चळवळ बनावी
अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचार निर्मूलन समितीने मतदान जागृतीसाठी नेहमीच प्रबोधन केले आहे़ लोकशाहीने सर्वसामान्यांना प्रदान केलेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येकाने केलाच पाहिजे़ मतदानाचा टक्का वाढवायचा असेल तर प्रशासनाने केवळ जनजागृती कार्यक्रम घेऊन चालणार नाही तर ही व्यापक चळवळ बनली पाहिजे़ सर्वसामान्यांपर्यंत मतदानाचे महत्त्व गेले पाहिजे़ मतदानाच्या दिवशी अनेकजण घरात बसणेच पसंत करतात़ राजकीय वर्तुळात गुंडांचा वाढता वावर व दबावतंत्र यामुळे अनेकजण मतदान केंद्राकडे फिरकत नाहीत़ त्यासाठी भयमुक्त व शांततापूर्ण वातावरण बनविणे गरजेचे आहे़ आम्ही ५० हजार पॉम्पलेटस् वाटणार आहोत़ पुस्तिकाही वाटल्या जाणार आहेत़ मतदान जागृतीसाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो, असेही अ‍ॅड़ देशमुख यांनी सांगितले़ मतदानाचा हक्क सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचा केला पाहिजे़ मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंकुश हवा, इतके केले तरी मतदानाचा टक्का वाढेल असे ते म्हणाले़ (प्रतिनिधी)

Web Title: Increasing the percentage of votes due to bullying, insecurity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.