शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद शहराध्यक्षांबद्दल वाढत्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 19:21 IST

विजय साळवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची फारच लवकर महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली

ठळक मुद्देशहराध्यक्षांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह पदाधिकाऱ्यांबाबत कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय साळवे यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक कार्यकर्ते प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून, त्यांच्याबद्दलच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

काशीनाथ कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विजय साळवे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बनले. यातून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मराठ्यांचा पक्ष, ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न झाला. विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षाचे एक नेते कदीर मौलाना यांच्या आग्रहामुळे विजय साळवे यांची ही नियुक्ती झाली. कार्याध्यक्ष म्हणून अभिषेक देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली व दलित-मराठा, असे संतुलन साधण्यात आले. 

विजय साळवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची फारच लवकर महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली, त्यावेळी प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांची नियुक्ती झाल्यापासून विशेषत: जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तिखट प्रतिक्रिया उमटली व त्यांचे राष्ट्रवादी भवनात जाणे कमी झाले. मध्यंतरी राज्याचे अल्संख्याकमंत्री नवाब मलिक हे आले असताना त्यांच्यासमोरच राष्ट्रवादी भवनात माजी शहराध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. आम्हाला मान नसेल, तर आम्ही राष्ट्रवादी भवनात का यावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. 

शुक्रवारी मुश्ताक अहमद म्हणाले, विजय साळवे यांना बदलले पाहिजे, अशी मागणी आम्ही वरपर्यंत अगदी शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत केली आहे. आजही आम्ही या मागणीवर ठाम आहोत व शहराला लवकरात लवकर मुस्लिम शहराध्यक्ष देऊन न्याय दिला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व निष्ठावंत कार्यकर्ते मोतीलाल जगताप म्हणाले, शहराध्यक्ष हे जबाबदारीचे पद असून, विद्यमान अध्यक्ष हे त्याचे भान ठेवून काम करतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मनपा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सातत्याने राष्ट्रवादी भवनात बैठका, कार्यक्रम होत असतात. इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक यांच्यामुळे राष्ट्रवादी भवनात गर्दी वाढू लागली आहे; परंतु मारहाणीसारखे प्रकार घडत असतील, तर आमच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांवरची नाराजी वाढत चालली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका