सोयगाव परिसरात चक्रीवादळाचा वाढला प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:05 IST2021-05-18T04:05:32+5:302021-05-18T04:05:32+5:30

सोयगाव : सोयगाव परिसरात सोमवारी पहाटेपासून चक्रीवादळाचा दहा गावांना तडाखा बसला आहे. तब्बल दहा तासांपासून अधूनमधून वादळीचा सोसाट्याचा वारा ...

Increased impact of cyclone in Soygaon area | सोयगाव परिसरात चक्रीवादळाचा वाढला प्रभाव

सोयगाव परिसरात चक्रीवादळाचा वाढला प्रभाव

सोयगाव : सोयगाव परिसरात सोमवारी पहाटेपासून चक्रीवादळाचा दहा गावांना तडाखा बसला आहे. तब्बल दहा तासांपासून अधूनमधून वादळीचा सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, बहुलखेडा शिवारात मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे.

रविवारी दुपारपासूनच सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यात भर पडत सोमवारी पहाटेपासूनच वादळी वाऱ्याचा फटका तालुक्यातील दहा गावांना बसला असून या गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी जुनाट वृक्ष उन्मळून पडले. तर अनेक ठिकाणी झाडे वाकली आहेत. धिंगापूर, निंबायती परिसर चक्री वादळाने माखून गेला होता. कामानिमित्त घराबाहेर व शेतीकामासाठी शेतशिवारात गेलेल्या नागरिकांना धुळीचा सामना करावा लागला. तर बहुलखेडा, कवली परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. बदलत्या वातावरणाने सगळीकडे गारवा सुटला होता.

--

फोटो : सोयगाव परिसरात वादळी वाऱ्याने वाकलेली झाडे.

170521\ynsakal75-0549514951_1.jpg

चक्रीवादळाने सोयगाव परिसरातील झाडे असे वाकली गेली होती.

Web Title: Increased impact of cyclone in Soygaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.