तिरुपती विशेष रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ
By Admin | Updated: September 12, 2014 00:30 IST2014-09-12T00:26:00+5:302014-09-12T00:30:16+5:30
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने औरंगाबाद- तिरुपती- औरंगाबाद साप्ताहिक विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या वाढविल्या आहेत

तिरुपती विशेष रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने औरंगाबाद- तिरुपती- औरंगाबाद साप्ताहिक विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या वाढविल्या आहेत. १९ आणि २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता औरंगाबाद स्थानकाहून ही रेल्वे निघेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल. जालना, परभणी, नांदेड, सिकंदराबाद, विजयवाडामार्गे ही रेल्वे तिरुपती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २० आणि २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१० वाजता तिरुपतीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता औरंगाबादेत पोहोचेल.