क्रीडा संस्कृती वाढवावी- कासार

By Admin | Updated: October 7, 2014 00:12 IST2014-10-06T23:58:04+5:302014-10-07T00:12:32+5:30

हिंगोली : दसरा महोत्सवाच्या निमित्तानेच नव्हे, वर्षभर नियमितरित्या क्रीडा स्पर्धा झाल्या तर खेळाडूंना वाव मिळणार आहे.

Increase sports culture- Kasar | क्रीडा संस्कृती वाढवावी- कासार

क्रीडा संस्कृती वाढवावी- कासार

हिंगोली : दसरा महोत्सवाच्या निमित्तानेच नव्हे, वर्षभर नियमितरित्या क्रीडा स्पर्धा झाल्या तर खेळाडूंना वाव मिळणार आहे. मुळात बलसंवर्धन व आनंद लुटण्यासाठी खेळ आवश्यक असल्यामुळे क्रीडा संस्कृती वाढवण्याची गरज आहे.
महोत्सवातील विविध खेळातील विजेत्यांना सोमवारी कल्याण मंडपम् येथे परितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, न. प. चे अभियंता हरिकल्याण येलगट्टे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया,, गोविंदप्रसाद चौधरी, डॉ. श्रीधर कंदी, डॉ. विजय निलावार आदी उपस्थित होते. कासार म्हणाले दसऱ्यातील स्पर्धांत महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कारण खेळातून व्यक्तिमत्त्व व आत्मविश्वास निर्माण होतो आणि तोच आयुष्यभर कामी येतो, असेही कासार म्हणाले. सूत्रसंचालन पंकज अग्रवाल व प्रकाश इंगोले यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Increase sports culture- Kasar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.