वाढवणा परिसरात आॅनलाईन मटका तेजीत
By Admin | Updated: May 22, 2017 23:45 IST2017-05-22T23:42:09+5:302017-05-22T23:45:42+5:30
लातूर - वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आॅनलाईन मटका तेजीत असून, याकडे पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

वाढवणा परिसरात आॅनलाईन मटका तेजीत
लातूर - उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आॅनलाईन मटका तेजीत असून, याकडे पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. वाढवणा पाटी, वाढवणा, हाळी हंडरगुळी येथे हा मटका घेतला जात असल्याची चर्चा आहे. पोलिसांचे आर्थिक हितसंबंध गुंतल्यामुळेच हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोपही जाणकार नागरिकांतून होत आहे. शिवाय, अवैध दारू विक्रीही सुरू असून, याकडेही पोलिसांची डोळेझाक होत आहे.