यंदा भूजल पातळीत वाढ
By Admin | Updated: May 21, 2014 00:19 IST2014-05-21T00:08:19+5:302014-05-21T00:19:28+5:30
जालना : जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा भूजल पातळीत वाढ झाली आहे. याबाबतचा अहवाल लवकरच पूर्ण करून जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात येणार आहे

यंदा भूजल पातळीत वाढ
जालना : जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा भूजल पातळीत वाढ झाली आहे. याबाबतचा अहवाल लवकरच पूर्ण करून जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात येणार आहे. भूजल विकास यंत्रणेच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील विहिरींची भूजल पातळी मोजण्याचे सर्वेक्षण केले जाते. २०१३ मध्ये आॅक्टोबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा, अंबउ व घनसावंगी या तालुक्यात भूजल पातळीत घट झाल्याचे लक्षात आले होते. तर मार्च २०१४ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ११० विहिरींची भूजल पातळी मोजण्याचे काम सुरू आहे. या विहिरींची पातळी चांगल्याप्रकारे वाढल्याचे दिसून आले आहे. पर्जन्यमान आणि सरासरीच्या आधारे पाणी पातळी ३ मीटरपेक्षा खाली गेल्यास तो भाग टंचाईग्रस्त असल्याचा अंदाज काढता येतो, असे कनिष्ठ भूजल वैज्ञानिक डॉ. एस.जी. गायकवाड यांनी सांगितले. प्रत्येक वर्षी चारवेळा भूजल सर्वेक्षण केले जाते. पाऊस पडण्यापूर्वी मे महिन्यात आणि पाऊस पडल्यानंतर जानेवारी ते मार्च या महिन्यात ही तपासणी केली जाते. यावर्षी सद्यस्थितीत ११० विहिरींची भूजल पातळीचे सर्र्वेक्षण सुरू असून आतापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक सर्वेक्षणाचे काम झालेले आहे. त्याद्वारे भूजल पातळीत वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाजही वर्तविण्यात आला आहे. गतवर्षी ११० विहिरींचे भूजल सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात १०७ विहिरींची पातळी ३ मीटरपेक्षा अधिक होती. तर भोकरदन, जाफराबाद, अंबड या तालुक्यातील तीन विहिरींची पातळी खाली होती. मात्र यंदा मार्च २०१४ मध्ये या विहिरींची पातळी वाढली आहे. भूजल सर्र्वेेक्षण विभागाने सदरील ठिकाणी जलपुनर्भरण मोहीम राबविल्याने पाणी पातळीत वाढ झाल्याचा दावाही या विभागाच्या अधिकार्यांकडून केला जात आहे. उटवद येथील प्राथमिक शाळेच्या छतावरील पाणी जमिनीत जिरवल्याने तेथील विहिरी, हातपंपांमध्ये पाणी वाढल्याचे गायकवाड यांनी सांगितले. भूजल पातळी वाढविण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचे बळकटीसाठी स्थानिक परिसरानुसार सिमेंट बंधारे, चर, आणि जलपुनर्भरणाचे अनेक प्रयोग झाल्याने जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. (प्रतिनिधी) पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत विविध कारणांमुळे कमी होत आहे. परंतु जमिनीतील पाणी अमर्याद उपसले जात आहे. परिणामी भूजल पातळी जलदगतीने खाली जात आहे. पाण्याची तूट भरून काढण्यासाठी जलपुनर्भरण काळाची गरज बनली आहे. मात्र प्रशासकीय स्तरावरून पाहिजे तशी सकारात्मक कृती केल्याचे दिसून येत नाही. पुनर्भरणासाठी विविध विभागाने केलेल्या योजना कागदावरच आहेत. जिल्ह्यात आॅक्टोबर २०१३ व मार्च २०१४ मध्ये झालेल्या भूजल सर्व्हेक्षणानुसार पाणी पातळीत वाढ झाली आहे. तालुका २०१३ २०१४ जालना १.०६ मी. १.५१ बदनापूर १.७४ ०.९४ भोकरदन १.४८ ३.३० जाफराबाद १.१० ३.८३ परतूर २.६१ २.८९ मंठा ०.०८ २.८९ अंबड ०.५५ १.२३ घनसावंगी २.४९ २.८४