जादा बसेसमुळे आगाराच्या उत्पन्नात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:33 IST2017-07-19T00:09:14+5:302017-07-19T00:33:21+5:30
हिंगोली : पंढरपूर यात्रेनिमित्त हिंगोली आगारातर्फे एकूण २२ जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या बसेसचे यंदा आगाराला ८ लाख ४१ हजार रूपये उत्पन्न मिळाले.

जादा बसेसमुळे आगाराच्या उत्पन्नात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पंढरपूर यात्रेनिमित्त हिंगोली आगारातर्फे एकूण २२ जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. प्रवासी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारातर्फे जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. गतवर्षीपेक्षा आगाराच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. जादा बसेसचे यंदा आगाराला ८ लाख ४१ हजार रूपये उत्पन्न मिळाले.
हिंगोली आगारातर्फे दरवर्षी पंढरपूर यात्रेसाठी जादा बसेसचे नियोजन केले जाते. त्या अनुषंगाने यावर्षी यात्रेसाठी २२ बसेस सोडण्यात आल्या. सदर बसेसच्या वेळा निश्चित नसल्या तरी, प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन बसेस सोडण्यात आल्या. वाहक-चालकांचा तुटवडा असूनही आगारातर्फे भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेत जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. शिवाय याबाबत संबधित चालक व वाहकांना सूचनाही दिल्या होत्या. ३० जून ते १० जुलै या कालावधीत पंढरपूर यात्रेकडे जादा बसेस धावल्या. गतवर्षी सोडण्यात आलेल्या बसेसच्या ५० फेऱ्यांतून १८ हजार २७१ प्रवासी वाहतूक झाली होती. त्यातून आगारास ४ लाख ३७ हजारांचे उत्पन्न झाले. यावर्षी मात्र बसेसच्या संख्येत वाढ केल्याने गतवर्षी पेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.