कोरोनाच्या ६२ रुग्णांची वाढ, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:40+5:302021-01-08T04:11:40+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ६२ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ६६ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना एका ...

कोरोनाच्या ६२ रुग्णांची वाढ, एकाचा मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ६२ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ६६ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ९३ एवढी झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४४ हजार ४०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १ हजार २१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६२ रुग्णांत मनपा हद्दीतील ४६, ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६१ आणि ग्रामीण भागातील ५, अशा एकूण ६६ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. पिंप्रीराजा येथील ६२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
शिवाजीनगर १, बीड बायपास ३, न्यू हनुमाननगर १, ज्योतीनगर १, जाधववाडी हर्सूल १, कांचनवाडी २, पदमपुरा १, पानदरीबा १, उत्तमनगर १, सह्याद्री हिल्स २, एस.बी कॉलनी १, उल्कानगरी २, उस्मानपुरा १, एसबीएच कॉलनी १, हडको १, कुशलनगर १, श्रीनिकेतन कॉलनी २, अंबिकानगर २, व्यंकटेशनगर १, एन-८, सिडको १, एन-८, गजराज सो. १, अन्य १८.
ग्रामीण भागातील रुग्ण
रांजणगाव १, शिवराई, कन्नड १, अन्य १४.