शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षेत वाढ; गुन्ह्यांमध्ये घट

By admin | Updated: February 2, 2015 01:14 IST

शिरीष शिंदे . बीड तपास योग्य पद्धतीने झाल्याने शिक्षेच्या प्रमाणात तिपटीने वाढ झाली असून त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण आपोआपच घसरले आहे. २०१३ या साली गुन्ह्यांचे प्रमाण अधिक होते

शिरीष शिंदे . बीड

तपास योग्य पद्धतीने झाल्याने शिक्षेच्या प्रमाणात तिपटीने वाढ झाली असून त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण आपोआपच घसरले आहे. २०१३ या साली गुन्ह्यांचे प्रमाण अधिक होते मात्र २०१४ मध्ये हा आलेख खाली आला आहे. २०१३ साली एकुण ४ हजार ६१७ गुन्हे दाखल झाले होते तर २०१४ मध्ये ४ हजार २९० गुन्हे दाखल झाले होते. त्यात ३२७ गुन्हांची घट झाली आहे. २०१३ मध्ये ९३ खून झाले होते तर खुनाचे प्रमाणे प्रमाण २०१४ मध्ये ७७ खून झाले. हे प्रमाण १६ ने घटले होते. २०१४ मध्ये दरोड्याचे एकुण २१ गुन्हे घडले होते त्यातील १७ गुन्हे तांत्रिक होते केवळ चार गुन्हे गंभीर स्वरुपाचे होते. या गुन्ह्यांचा छडा लागलाअसून आरोपींना अटक करण्यात आली आहे.२०१३ मध्ये मारामारीचे ८६४ तर २०१४ मध्ये ८३२ गुन्हे होते. दंगलीच्या गुन्ह्यात ७ ने घट झाली आहे. २०१३ मध्ये ३७८ तर २०१४ मध्ये ३०४ घडले आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यात २२ ने घट झाली आहे. २०१३ मध्ये बलात्काराचे गुन्हे ९२ होत तर २०१४ मध्ये ७० गुन्हे दाखल झाले आहेत. दारुबंदीच्या गुन्ह्यांची वाढ झाली आहे. २०१३ मध्ये ६९० तर २०१४ मध्ये १ हजार ३६० गुन्हे दाखल झाले आहेत. मोटार अपघातामध्ये फारशी वाढ झालेली नाही २०१३ मध्ये मोटार अपघाताच्या ६१२ घटना घडल्या होत्या तर ६२४ अपघात हे २०१४ मध्ये घडल्या आहेत. प्राणघातक अपघातात २९७ जणांचा मृत्यू २०१४ साली झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची प्रकरणात २१ ने घट झाली आहे. २०१३ मध्ये या प्रकारची १०३ गुन्हे दाखल झाली होती तर २०१४ मध्ये ८२ प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. प्रतिबंधात्मक कारवाया कमी तरी गुन्ह्यात घट प्रत्येक वर्षी प्रतिबंधात्मक कारवाई करुन गुन्हेगारांवर अंकुश मिळविण्याचा प्रयत्न केला जातो मात्र २०१४ साली १२,३९० प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. या कारवायांचे प्रमाण कमी असतानाही गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे. २०१३ साली १८ हजार ४०० प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या होत्या.