शहरात ९, ‘ग्रामीण’मध्ये १७ कोरोना रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:04 IST2021-07-22T04:04:27+5:302021-07-22T04:04:27+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ९, ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा ...

शहरात ९, ‘ग्रामीण’मध्ये १७ कोरोना रुग्णांची वाढ
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ९, ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ३८ जणांना सुटी देण्यात आली, तर उपचार सुरू असताना जिल्ह्यातील एक आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या बुधवारीही दहाखाली राहिली. जिल्ह्यात सध्या २७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २४८ आणि शहरातील २७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १ लाख ४७ लाख ८२ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४७८ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ४ आणि ग्रामीण भागातील ३४ अशा ३८ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना पोरगाव, पैठण येथील ३५ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ८२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
नाशिक रोड परिसर १, उल्कानगरी २, ठाकरेनगर १, गोलटगाव १, एन बारा, हडको १, घाटी परिसर १, अन्य २
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद १, गंगापूर ५, कन्नड १, वैजापूर ९, पैठण १