६८ रुग्णांची वाढ, १३१ रुग्णांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:34+5:302020-12-17T04:28:34+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी कोरोनाच्या ६८ रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या १३१ रुग्णांना सुटी देण्यात आली. तसेच ...

An increase of 68 patients, discharge to 131 patients | ६८ रुग्णांची वाढ, १३१ रुग्णांना सुटी

६८ रुग्णांची वाढ, १३१ रुग्णांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी कोरोनाच्या ६८ रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या १३१ रुग्णांना सुटी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,३७५ एवढी झाली आहे. यातील ४२,६४३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर १,१७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६८ रुग्णांत मनपा हद्दीतील ५४, ग्रामीण भागातील १४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ११६ आणि ग्रामीण भागातील १५ अशा १३१ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. हर्सूल येथील ७० वर्षीय स्त्री, वाकळा येथील ४१ वर्षीय पुरुष, गंगापुरातील ६५ वर्षीय पुरुष आणि पैठण येथील ५५ वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

विष्णूनगर २, दशमेशनगर ३, एन दोन, सिडको ३, समर्थनगर १, उल्कानगरी ३, बालाजीनगर १, बीड बायपास ४, विजयनगर १, बजाजनगर १, विवेकानंदनगर २, ऑरेंज प्राइड, म्हाडा १, त्रिमूर्ती चौक २, ज्योतीनगर १, टीव्ही सेंटर २, बालकृष्णनगर १, चिकलठाणा १, औरंगपुरा १, नारळीबाग १, सिल्क मिल कॉलनी २, एन अकरा, सिडको १, प्रकाशनगर १, जयभवानीनगर १, भाग्यनगर १, चिंतामणी कॉलनी १, एन तीन, सिडको २, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी २, गादिया पार्क १, अन्य ११.

ग्रामीण भागातील रुग्ण

म्हाडा कॉलनी १, बजाजनगर १, केळगाव, सिल्लोड १, साठेगाव, वैजापूर १, चौका, फुलंब्री १, नाथ गल्ली, पैठण १, अन्य ८.

Web Title: An increase of 68 patients, discharge to 131 patients