कोरोनाच्या ३३ रुग्णांची वाढ, ३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:02 IST2020-12-28T04:02:16+5:302020-12-28T04:02:16+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ३३ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ६६ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना औरंगाबाद ...

Increase of 33 corona patients, 3 deaths | कोरोनाच्या ३३ रुग्णांची वाढ, ३ मृत्यू

कोरोनाच्या ३३ रुग्णांची वाढ, ३ मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ३३ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ६६ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील २ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ३२२ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४३ हजार ६१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार १९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३३ रुग्णांत मनपा हद्दीतील १९, ग्रामीण भागातील १४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५४ आणि ग्रामीण भागातील १२ अशा एकूण ६६ रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली. ठाकरेनगरातील ७५ वर्षीय स्त्री, एन तीन सिडकोतील ६५ वर्षीय पुरुष आणि बीड येथील ७३ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

भवानी चौक १, समृद्धी पार्क १, एन-चार, सिडको २, एसबीआय मुख्यालय परिसर १, एन-पाच, सिडको १, कौशलनगर, जालना रोड १, अलोकनगर २, मनपा परिसर १, एल अँड टी कंपनी १, एन-अकरा, मयूर पार्क १, हनुमाननगर १, अन्य ६.

ग्रामीण भागातील रुग्ण

माळीवाडा १, वाळूज १, बजाजनगर २, अन्य १०.

Web Title: Increase of 33 corona patients, 3 deaths