जिल्ह्यात २८ कोरोना रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:46+5:302021-02-05T04:21:46+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी २८ कोरोना रुग्णांची भर पडली आणि २४ जण कोरोनामुक्त झाले, तर उपचार सुरू असताना एका ...

जिल्ह्यात २८ कोरोना रुग्णांची वाढ
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी २८ कोरोना रुग्णांची भर पडली आणि २४ जण कोरोनामुक्त झाले, तर उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ४१ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार ६९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या २८ रुग्णांत मनपा हद्दीतील २०, ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ९ आणि ग्रामीण भागातील १५, अशा एकूण २४ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. नागेश्वरवाडीतील ६३ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
नागेश्वरवाडी २, जय विश्वभारती कॉलनी १, एन-४, सिडको १, हनुमाननगर १, राजेशनगर १, चिकलठाणा १, ज्योतीनगर १, एन-७ येथे १, समर्थनगर १, मुकुंदवाडी १, अन्य ९.
ग्रामीण भागातील रुग्ण
लोहगड नांद्रा १, अन्य ७