जिल्ह्यात १९ कोरोना रुग्णांची वाढ, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:06 IST2021-09-17T04:06:02+5:302021-09-17T04:06:02+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात मनपा हद्दीत ७ आणि ग्रामीण भागात १२, अशा १९ कोरोना रुग्णांची वाढ झाली. उपचार ...

Increase of 19 corona patients in the district, one death | जिल्ह्यात १९ कोरोना रुग्णांची वाढ, एकाचा मृत्यू

जिल्ह्यात १९ कोरोना रुग्णांची वाढ, एकाचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात मनपा हद्दीत ७ आणि ग्रामीण भागात १२, अशा १९ कोरोना रुग्णांची वाढ झाली. उपचार घेऊन २४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. उपचार सुरू असताना गेल्या २४ तासांत ग्रामीण भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या २२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ४३५ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ६५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३ हजार ५५८ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील नऊ आणि ग्रामीण भागातील १५ अशा २४ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना वाहेगाव येथील ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

घाटी परिसर १, एमजीएम रुग्णालय परिसर १, शिवाजीनगर १, पारिजातनगर ४

ग्रामीण भागातील रुग्ण

औरंगाबाद १, गंगापूर १, सिल्लोड १, वैजापूर ५, पैठण ४

Web Title: Increase of 19 corona patients in the district, one death