जिल्ह्यात १७ कोरोना रुग्णांची वाढ, तीन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:04 IST2021-09-26T04:04:26+5:302021-09-26T04:04:26+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात मनपा हद्दीत ४, तर ग्रामीण भागात १३, अशा १७ कोरोना रुग्णांची वाढ झाली. उपचार ...

An increase of 17 corona patients, three deaths in the district | जिल्ह्यात १७ कोरोना रुग्णांची वाढ, तीन मृत्यू

जिल्ह्यात १७ कोरोना रुग्णांची वाढ, तीन मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात मनपा हद्दीत ४, तर ग्रामीण भागात १३, अशा १७ कोरोना रुग्णांची वाढ झाली. उपचार घेऊन २८ रुग्ण घरी परतले. गेल्या २४ तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील एक आणि अन्य जिल्ह्यांतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात सध्या १४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ५९६ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३ हजार ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील १० आणि ग्रामीण भागातील १८, अशा २८ रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना बोरसर (ता. वैजापूर) येथील ७५ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील बाजार गेवराई, (ता. बदनापूर) येथील ८५ वर्षीय महिला आणि हिंगोली जिल्ह्यातील अरळ वसमत येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

मुकुंदवाडी १, माऊलीनगर १, अन्य २

ग्रामीण भागातील रुग्ण

फुलंब्री १, गंगापूर ८, वैजापूर ३, पैठण १

Web Title: An increase of 17 corona patients, three deaths in the district