जिल्ह्यात १,५४२ कोरोना रुग्णांची वाढ, २१ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:02 AM2021-04-02T04:02:01+5:302021-04-02T04:02:01+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाच्या १,५४२ नव्या रुग्णांची वाढ झाली आणि १,२२० जण उपचार घेऊन घरी परतले. तर ...

An increase of 1,542 corona patients, 21 deaths in the district | जिल्ह्यात १,५४२ कोरोना रुग्णांची वाढ, २१ मृत्यू

जिल्ह्यात १,५४२ कोरोना रुग्णांची वाढ, २१ मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाच्या १,५४२ नव्या रुग्णांची वाढ झाली आणि १,२२० जण उपचार घेऊन घरी परतले. तर औरंगाबाद जिल्ह्यातील १९ आणि अन्य जिल्ह्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १५,५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८२,६७९ झाली आहे. यात ६५,४३८ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १,६७० रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १,५४२ रुग्णांत मनपा हद्दीतील १,०९० आणि ग्रामीण भागातील ४५२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ९००, तर ग्रामीण भागांतील ३२० अशा १,२२० रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना ताडपिंपळगाव, कन्नड येथील ६५ वर्षीय पुरुष, भारतनगर येथील ३७ वर्षीय महिला, बीड बायपास परिसरातील ६५ वर्षीय महिला, फुलंब्रीतील ३३ वर्षीय पुरुष, प्रगती काॅलनीतील ६५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, भावसिंगपुऱ्यातील ७२ वर्षीय पुरुष, उस्मानपुऱ्यातील ६० वर्षीय पुरुष, श्रेयनगर येथील ७४ वर्षीय पुरुष, गजानन काॅलनीतील ७५ वर्षीय पुरुष, खंडाळा, वैजापूर येथील ६७ वर्षीय पुरुष, मजनू हिल येथील ७० वर्षीय पुरुष, नागेश्वरवाडीतील ८५ वर्षीय पुरुष, एन-४ येथील ८३ वर्षीय महिला, उल्कानगरीतील ६८ वर्षीय महिला, एकनाथनगरातील ६२ वर्षीय पुरुष, बसैयेनगर येथील ७७ वर्षीय पुरुष, डाॅ. हेडगावर रुग्णालय परिसरातील ७९ वर्षीय पुरुष, जटवाडा येथील ७० वर्षीय महिला आणि बुलढाणा जिल्ह्यातील ३३ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद ८, सातारा परिसर २२, गारखेडा १५, बीड बायपास २८, सादातनगर १, एन-१ येथे ९, विष्णूनगर ४, घाटी १, एन-९ येथे १३, सूतगिरणी चौक ७, मनजीतनगर ३, शिवाजीनगर ११, एन-६ येथे ८, एन-८ येथे ५, खोकडपुरा १, काल्डाकॉर्नर २, एन-७ येथे १८, चिकलठाणा १, उल्कानगरी २०, नक्षत्रवाडी ३, व्हिजन सिटी १, शहानूरवाडी ५, एन-५ येथे ११, नागेश्वरवाडी ३, वेदांतनगर ४, ज्योतीनगर ५, पडेगाव २, प्रत्या अपार्टमेंट १, स्वामी समर्थ अपार्टमेंट १, भावसिंगपुरा २, पदमपुरा १२, अण्णाभाऊ साठे चौक १, हर्सूल ५, बन्सीलालनगर २, अशोकनगर जवळ १, नारळीबाग २, टिळक नगर २, प्रताप नगर १, ज्ञानेश्वर नगर ६, मयुरबन कॉलनी २, आलोक नगर १, शंभू नगर १, रोहिदास नगर १, ईटखेडा ४, एसआरपीएफ कॅम्प १, छत्रपती नगर ३, विश्वजित रेसिडेन्सी २, आकाशवाणी १, इंद्रप्रस्थ इनक्लेव्ह १, पैठण गेट ४, गोल्डन सिटी १, सेव्हन हिल परिसर १, बापू नगर १, मुकुंदवाडी ८, ट्रान्सग्लोबल करिअर प्रा. लि. १, समर्थ नगर ४, अपर तहसील कार्यालय १, दिवानदेवडी १, तापडिया नगर ३, एन-११ येथे १३ , खिंवसरा वुड्स १, मित्र नगर २, पारगावकर हॉस्पिटल १, निराला बाजार १, पानदरीबा रोड १, समता नगर १, उदय कॉलनी १, वसंत नगर १, उस्मानपूरा ४, गजानन मंदिर २, पुंडलिक नगर ५, सरस्वती नगर १, न्यू गजानन कॉलनी ३, सारंग सोसायटी १, न्यू हनुमान नगर ३, हनुमान नगर ९, कासलीवाल गार्डन १, अरिहंत नगर ३, विजय नगर ७, अजिंक्य नगर १, अजब नगर ५, गुरुदत्त नगर २, न्याय नगर १, रेणुका नगर १, भागुलती कॉलनी १, एन-४ येथे १३, श्रीनगर १, विमान नगर १, विशाल नगर ३, चेतक घोडा २, जवाहर कॉलनी ३, देवळाई चौक २, शिवशंकर कॉलनी ४, जय भवानी नगर ४, जालान नगर ५, न्यू विशाल नगर १, टी.व्ही.सेंटर १, माऊली नगर १, गजानन नगर ४, देवळाई परिसर १, खडकेश्वर १, एस.बी.कॉलनी १, खाराकुंआ १, आदर्श कॉलनी १, एन-३ येथे १, स्नेहवर्धिनी कॉलनी १, एशियन हॉस्पिटल ८, एन-२ येथे ८, गणेश नगर २, औरंगाबाद विमानतळ स्टाफ १, श्रेय नगर १, गादिया विहार १, पृथ्वीराज नगर २, संसार नगर १, झांबड इस्टेट १, सावरकर चौक २, न्यू पहाडसिंगपुरा २, नंदनवन कॉलनी १, भडकल गेट १, राजाबाजार ४, संदेश नगर १, ॲपेक्स हॉस्पिटल १, सनी सेंटर २, सिडको २, म्हसोबा नगर १, टेलिकॉम हाऊसिंग सोसायटी १, गणेश हाऊसिंग सोसायटी १, साई पार्क कॉलनी १, पिसादेवी रोड २, जटवाडा रोड २, राधास्वामी कॉलनी १, ब्लू व्हेल १, एमआयडीसी औरंगाबाद १, दशमेश नगर ३, भारत माता नगर १, मयूर नगर १, स्वामी विवेकानंद नगर ४, सुरेवाडी २, नवजीवन कॉलनी २, म्हसोबा नगर १, पवन नगर ४, मयूर पार्क ५, यादव नगर २, लेबर कॉलनी १, श्रीकृष्ण नगर १, जाधववाडी ३, नवनाथ नगर १, सुभाषचंद्र नगर १, विश्रांती नगर १, ठाकरे नगर १, दही हंडी गल्ली २, एमआयटी हॉस्पिटल जवळ २, न्यू एस. टी. कॉलनी १, पोलीस आयुक्तालयासमोर १, सहारा संगम १, सारा विहार १, साईश्रद्धा बेंच मार्क मागे १, न्यू छत्रपती नगर १, सारा वैभव १, नारेगाव १, कांचनवाडी ६, अजित सिड १, नाथपूरम १, रामनगर २, बायजीपुरा १, कैलास नगर ४, टाऊन सेंटर १, दत्तनगर २, एन-१३ येथे १, सह्याद्री हिल शिवानगर १, पन्नालाल नगर १, राजगड तिरूपती कॉलनी १, सहयोग नगर १, हर्ष नगर १, माऊली नगर १, राजगुरू नगर १, विजय चौक १, रेणुका नगर १, नाईक नगर १, आदर्श कॉलनी १, कोंकणवाडी १, दर्गा रोड १, संजय हाऊसिंग सोसायटी १, सिंधी कॉलनी २, भानुदास नगर १, पीरबाजार ३, कासलीवाल तारांगण ३, श्रीहरीश्रीकृष्ण नगर १, आनंद नगर ५, जिल्हाधिकारी कार्यालय १, श्रद्धा कॉलनी १, स्नेह सावली केअर सेंटर १, पैठण रोड १, मिटमिटा २, श्रीकांत नगर १, चेतना नगर १, गुलमंडी १, पगारिया कॉलनी ३, एमआयटी कॉलेज समोर १, एन-१२ येथे १, मिलिट्री हॉस्पिटल १, देवानगरी १, एकनाथ नगर १, मिलकॉर्नर पोलीस कॉलनी २, सिल्कमिल कॉलनी १, स्नेह नगर २, मिसारवाडी १, बसैये नगर ३, एमजीएम स्टाफ १, बजरंग चौक १, सावरकर नगर १, नंदिनी नगर १, विनायक नगर १, अन्य ४९९

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाज नगर १४, सिल्लोड २, चितेगाव १, रांजणगाव दांडगा १, खुल्लोड १, आखातवाडा १, कुंभेफळ १, हर्सूल गाव ५, पिसादेवी ४, सावंगी २, रांजणगाव १, अष्टविनायक पार्क १, वडगाव कोल्हाटी ८, सिडको वाळूज महानगर १३, मनजीत प्राईड वाळूज १, देवगिरी नगर १, करोडी १, लक्ष्मी कॉलनी गंगापूर १, दौलताबाद ३, मयूर नगर १, पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूज १, वाळूज ३, तिसगाव १, सोयगाव १, सह्याद्री कॉलनी मोरे चौक १, पैठण १, कन्नड १, अन्य ३८०.

Web Title: An increase of 1,542 corona patients, 21 deaths in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.