सहा महिन्यांपासून पोस्ट ऑफिस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:06 IST2021-05-07T04:06:17+5:302021-05-07T04:06:17+5:30
निवेदनात म्हटले आहे की, पैठण एमआयडीसी परिसरातील संत एकनाथ साखर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात असलेली कामगार वसाहत व परिसरातील ...

सहा महिन्यांपासून पोस्ट ऑफिस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय
निवेदनात म्हटले आहे की, पैठण एमआयडीसी परिसरातील संत एकनाथ साखर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात असलेली कामगार वसाहत व परिसरातील इतर गावांसाठी सदरील पोस्ट ऑफिस सुरू असणे गरजेचे आहे. मात्र सप्टेंबर २०२० पासून ते बंद आहे. येथे पैशांचा भरणा होत नाही व रजिस्टर पोस्ट, मनिऑर्डर, जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नागपूर येथे सेवापुस्तक पडताळणीसाठी पाठवावे लागते. मात्र पोस्ट ऑफिस बंद असल्याने पोस्ट ऑफिस बंद असल्याने कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच नागरिक कामगारांना बचत खात्यात पैसे भरण्यासाठी पैठणला जावे लागते. त्यामुळे येथील पोस्ट ऑफिस सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
फोटो : बंद असलेले पोस्ट ऑफिस.
060521\samir rafik pathan_img-20210506-wa0002_1.jpg
बंद असलेले पोस्ट ऑफिस.