शिवसेनेत इनकमिंग
By Admin | Updated: November 26, 2014 01:12 IST2014-11-26T01:04:36+5:302014-11-26T01:12:08+5:30
औरंगाबाद : शिवसेनेत मागील वर्षभरानंतर मोठ्या प्रमाणात आज इनकमिंग झाले. राष्ट्रवादी काँगे्रस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेल्या जुन्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी

शिवसेनेत इनकमिंग
औरंगाबाद : शिवसेनेत मागील वर्षभरानंतर मोठ्या प्रमाणात आज इनकमिंग झाले. राष्ट्रवादी काँगे्रस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेल्या जुन्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पुन्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा हाती घेतला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे स्वागतच पक्षफुटीने झाले. सेना किं वा मनसे असे दोन पर्याय गेल्या मनपा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनीच निर्माण केले होते. तेच पर्याय २०१५ च्या निवडणूक तोंडावर निर्माण झाले आहेत.
राज यांच्यासमोर नव्याने पक्ष बांधणीचे आव्हान निर्माण झाले असून आगामी काळात मनसेतील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी सेनेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. मनसेत गेलेले सगळे मुळात शिवसेनेतीलच आहेत. ४
२०१० च्या मनपा निवडणुकीत ज्यांनी सेनेशी गद्दारी करून पक्ष सोडून मनसे, राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. उमेदवारी मिळवून निवडणूक लढविली आणि पराभवही पत्कारला. त्यांच्यामुळे सेनेचे उमेदवारही काही ठिकाणी पराभूत झाले. अशा मनसैनिकांना पुन्हा प्रवेश दिल्यामुळे निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. रामा हॉटेलमध्ये नवचैतन्याची गर्दी पाहिल्यानंतर मनपा निवडणुकीसाठी दावेदार असलेल्यांमध्ये घालमेल सुरू होती.
उत्साह... मराठवाडा दौऱ्यात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शिवसेनेत सुरू असलेले कार्यकर्त्यांचे इनकमिंग याचा आनंद मंगळवारी औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.४
जे जुने आहेत, निष्ठावान आहेत, त्यांना आधी सांभाळा, नंतर इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांना पक्षात घ्या. असे मत अनेकांनी व्यक्त केले. मनपा निवडणुकीत निष्ठावंतांना डावलले, तर भाजपाला ते जवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.