शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये भाजपला शिवसेना पाडणार खिंडार;आजी-माजी नगरसेवक धनुष्यबाण पेलवण्यास सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 20:01 IST

राज्यातील सत्ता जाताच भाजपमधून सेनेत इनकमिंग सुरू झाले आहे.

ठळक मुद्देभाजपचे माजी शहराध्यक्ष तनवाणीही जाणार?शिवसेनेत मेगा भरती सुरूतीन दिवसांत मोठा गट दाखल होणार

औरंगाबाद : महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेत आजपासून मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. भाजप समर्थक माजी महापौर गजानन बारवाल यांनी आज ‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. म्हणायला ही सदिच्छा भेट असली तरी बारवाल यांची एक प्रकारे घर वापसी झाली आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासह २० जणांचा एक मोठा गटही सेनेत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत हा  गट शिवसेनेत येण्याची दाट शक्यता आहे. 

मागील पाच वर्षांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात मेगा भरती केली होती. राज्यातील सत्ता जाताच भाजपमधून सेनेत इनकमिंग सुरू झाले आहे. एप्रिल २०२० मध्ये मनपाची सार्वत्रिक निवडणूक आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपमधील असंतुष्ट मंडळी सेनेच्या वाटेवर आहे. यामध्ये विद्यमान पाच नगरसेवकांचा समावेश आहे. २०१५ च्या मनपा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले काही भाजप कार्यकर्ते आहेत. सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये गेलेले काही माजी नगरसेवकही पुन्हा सेनेचा धनुष्यबाण पेलवण्यास सज्ज झाले आहेत.

महापालिकेत ११ अपक्ष नगरसेवकांची मोट बांधून भाजपसोबत गेलेले माजी महापौर गजानन बारवाल आज सकाळी अचानक विमानाने मुंबईला गेले. त्यांनी थेट मातोश्री गाठली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आ. संजय शिरसाट, आ. अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई यांची उपस्थिती होती. यानंतर गजानन बारवाल यांनी सांगितले की, ही तर फक्त सदिच्छा भेट होती. बारवाल मातोश्रीवर दाखल होताच औरंगाबाद शहरात भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली. विद्यमान नगरसेवक, कार्यकर्ते एकमेकांकडे शंकेने बघू लागले. दुसऱ्या टप्प्यात आणखी २० जण सेनेत दाखल होणार असल्याची कुजबुज सुरू झाली. यामध्ये पाच आजी नगरसेवक, काही माजी नगरसेवक, मागील मनपा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. एक मोठा गट किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वाखाली सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

मी अद्याप निर्णय घेतला नाहीभाजप सोडून सेनेत जाण्यासंदर्भात मी अद्याप कोणताही विचार केलेला नाही. आज सेनेत कोण गेले, हेसुद्धा मला माहीत नाही. मी शहरातच आहे, भाजपमध्येच आहे. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वीही मी पक्ष सोडणार अशी चर्चा शहरात होती. मी पक्ष सोडला का? कोण काय चर्चा करतंय हे मला माहीत नाही.- किशनचंद तनवाणी, माजी शहराध्यक्ष भाजप

सेनेने किमान तिकिटाची हमी द्यावीभाजपमधील एक मोठा गट सेनेत दाखल होणार आहे. पक्ष प्रवेशापूर्वी स्थानिक नेते, मुंबईच्या नेत्यांनी या कार्यकर्त्यांना किमान मनपा निवडणुकीत तिकीट देणार एवढे आश्वासन तरी द्यायला हवे. या मुद्यावर प्रवेश सोहळा दोन ते तीन दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे कळते.

भाजपमध्ये तनवाणी यांच्या नाराजीचे कारणभाजप शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड अलीकडेच करण्यात आली. मनपा निवडणुकीपर्यंत तरी शहराध्यक्षपद कायम राहील, असे तनवाणी यांना वाटत होते. मात्र, असे झाले नाही. मनपा निवडणुकीत शहराध्यक्ष म्हणून काही कार्यकर्त्यांचे पुनर्वसन त्यांना करता आले असते. ज्या विश्वासाने तनवाणी यांच्यासोबत कार्यकर्ते भाजपमध्ये आले होते, त्यांचे भवितव्य अधांतरी वाटू लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तनवाणी यांच्याकडे घर वापसीचा मुद्दा लावून धरला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक